आरोग्य व शिक्षणराजकीय

आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक येथे ९५ लक्ष रुपयांच्या विकासकामांचा शिवसेना उपनेते, मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ!!!

आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक येथे ९५ लक्ष रुपयांच्या विकासकामांचा शिवसेना उपनेते, मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ!!!

आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक येथे महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समिती मार्फत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सुमारे ९५ लाख रुपयांच्या विकासकामांचा शिवसेना उपनेते, मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ उत्साहात संपन्न झाला.

भूमिपूजन समारंभ संपन्न झाल्यानंतर गावातील सभागृहात सभा संपन्न झाली. चांडोली बुद्रुक गाव माझ्या पाठीशी सदैव ठाम उभे असल्याने गावासाठी भविष्यातही चांगल्या स्वरूपाचे काम करण्याचा प्रयत्न राहील व गावच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी शासन दरबारी पाठपुरावा करून मंजूर करून आणणार असल्याचे प्रतिपादन यावेळी आढळराव पाटील यांनी केले.

कार्यक्रमप्रसंगी चांडोली बुद्रुक येथील पोलिस दलात निवड झालेल्या युवक-युवतींचा विशेष सन्मान मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने विरंगुळा केंद्र, तसेच बैलगाडा मालकांच्या वतीने बैलगाडा घाटाच्या कामासाठी विशेष निधीची तरतूद करावी अशी मागणी नागरिकांनी करताच त्याला सकारात्मक प्रतिसाद देत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आढळराव पाटील यांनी दिल्या.

यावेळी शिवसेना आंबेगाव तालुकाप्रमुख अरुण गिरे, युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, युवासेना पुणे जिल्हाप्रमुख प्रविण थोरात पाटील, मा.सरपंच सौ.प्रितीताई प्रविण थोरात, शिवसेना पुणे जिल्हा संघटक अजित चव्हाण, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, उपसरपंच तुषार थोरात, मा.उपसरपंच पोपट थोरात, उत्तमराव थोरात, खरेदी विक्री संघाचे मा.अध्यक्ष साहेबराव थोरात पाटील, जबाजी थोरात, सोसायटी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर थोरात, जेष्ठ नागरिक संघ उपाध्यक्ष बाबुराव थोरात, किरण थोरात, सचिन थोरात, निकेश थोरात, राकेश मावकर, अरुण थोरात, ग्रामपंचायत सदस्या सौ.चित्रा चासकर, सौ.सोनाली थोरात, सौ.सरस्वती मावकर, सौ.स्वाती वैराळ, सौ.अपूर्वा थोरात, सौ.सीमा थोरात यांसह शिवसेनेचे आंबेगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.