आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आंबेगाव तालुक्यातील पुर्व भागात विजेच्या कडकडाटासह मान्सून पूर्व पावसाची हजेरी!!

लोणी, खडकवाडी परीसरात गाराही पडल्या!!

आंबेगाव तालुक्यातील पुर्व भागात मान्सून पूर्व पावसाची हजेरी!!

आंबेगाव तालुक्यातील पुर्व भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्याने हवेत गारवा निर्माण झाला.

आज संध्याकाळी 5.30 च्या नंतर जारकरवाडी, लोणी,धामणी, खडकवाडी सह लगतच्या परीसरात विजेच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व सरी कोसळल्याने काढणीला आलेली बाजरी, शेतात काढून ठेवलेला कांदा, शेवगा, गावरान आंबा, कोबी,फ्लॉवर, बीट यांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

लोणी परिसरात गारांचा पाऊस पडला आहे.लोणीसह धामणी परीसरात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवते आहे. या पावसाने पाण्याची समस्या सुटणार नसली तरी वळवाच्या या सरी जोरदार कोसळत राहाव्यात जेणेकरून पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरु करता येतील अशी भावना या भागांतील शेतकऱ्यांनी पंचनामाशी बोलताना व्यक्त केली.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.