आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी श्री. संतोष वळसे पाटील तर उपाध्यक्षपदी श्री. निलेश काण्णव यांची बिनविरोध निवड!!

आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी संतोष वळसे पाटील तर उपाध्यक्षपदी निलेश काण्णव यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डी.के. वळसे पाटील यांनी दिली.
पुणे जिल्हा पत्रकार संघाशी सलग्न असलेल्या आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभा दि.२८ रोजी मंचर येथे खेळी मेळीच्या वातावरणात पार पडली. या वेळेस पत्रकार संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकरणीची निवड संघाचे संस्थापक डि.के.वळसे पाटील, सल्लागार ॲड. विलास शेटे,काका होनराव यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार मार्गदर्शक एस.एम. देशमुख, शरद पाबळे, सुनील लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे कामकाज चालणार आहे
या वेळेस अध्यक्षपदी संतोष वळसे पाटील,उपाध्यक्ष पदी निलेश काण्णव यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष पदाची सूचना जयेश शहा यांनी मांडली तर उपाध्यक्ष पदाची सूचना ॲड विलास शेटे यांनी मांडली. कार्यकारणी सचिव चंद्रकांत घोडेकर, सहसचिव विवेक शिंदे, खजिनदार अरुण सरोदे, सहखजिनदार प्रताप हिंगे, पत्रकार परिषद प्रमुख (मंचर) जयेश शहा,पत्रकार परिषद प्रमुख (घोडेगाव) विकास गाडे, पत्रकार संघ निरीक्षक सुदाम बिडकर, हिशोब तपासनीस भरत चिखले, कार्यकारणी सदस्य पदी अरुण गोरडे,विशाल करंडे,लक्ष्मण ढोबळे,रवींद्र वाळके अशी निवड करण्यात आली होती. यावेळी पत्रकार संघाचे सदस्य अशोक वळसे, अशोक शेंगाळे, सुनील तोत्रे, संदीप गावडे विठ्ठल तांबडे यावेळेस उपस्थित होते.
यावेळी बोलताना संतोष वळसे पाटील म्हणाले पुढील काळात अनेक सामाजिक कार्यक्रम पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात येतील, त्याचबरोबर आंबेगाव तालुका मराठी पत्रकार सोशल मीडिया संघाची स्थापना करण्यात येणार आहे, सोशल मीडिया मध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना या संघात स्थान देण्यात येईल.
या वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रास्ताविक ॲड. विलास शेटे यांनी केले तर आभार जयेश शहा यांनी मांडले.
यावेळेस धर्मवीर पतसंस्थेचे संचालक प्रणव उर्फ पप्पू शेठ थोरात यांनी नवनिर्वाचित कार्यकरणीचा सत्कार केला.