जारकरवाडी (ता.आंबेगाव) येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन!!

जारकरवाडी (ता.आंबेगाव) येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन!!
आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडी ( ता. आंबेगाव) येथे पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या 298 व्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर प्रतिष्ठान कापडदरा,वैदवाडी,जारकरवाडी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या निमित्ताने बुधवार दिनांक 31 मे 2023 रोजी सकाळी ठीक 8.30 वाजता जारकरवाडी गावठाण येथे प्रतिमापूजन, सकाळी 9.30 वाजता वैदवाडी,कापडदरा येथे प्रतिमापूजन सायंकाळी 6.30 वाजता भव्य मिरवणूक 6.30 ते 7.30 या वेळेत ह. भ.प. श्री.बाळशिराम मिंडे महाराज यांचे व्याख्यान सायं. 7.30 वाजता महाप्रसाद आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन जारकरवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.