आरोग्य व शिक्षण

जागतिक महिला दिन सावलीच्या प्रांगणात उत्साहाने साजरा!!

आठ मार्च जागतिक महिला दिन सावलीच्या प्रांगणात अतिशय उत्साहाने साजरा केला गेला. या निमित्ताने, सावलीच्या रुग्णांसाठी दुपारचे जेवण सावलीच्या पुरुष कर्मचाऱ्यांनी बनवले आणि स्त्री कर्मचाऱ्यांना सुट्टीचा आनंद देण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळी साडेचार वाजता खास महिला कलाकारांचा समावेश असलेला आर्केस्ट्रा सादर केला गेला. यामध्ये दोन कलाकार वगळता बाकी सर्व गायक-वादक महिलाच होत्या. दोन तास चाललेल्या कार्यक्रमांमध्ये भक्तीगीता पासून पोवाड्यापर्यंत सर्व प्रकारच्या मराठी गीतांचा समावेश होता. यानंतर बहारदार लावणी नृत्यचाही आनंद प्रेक्षकांनी घेतला.

महिला दिनानिमित्त कोल्हापूरच्या वाशी प्राथमिक आरोग्य उप केंद्रावर काम करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, पर्यवेक्षक, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका अशा 40 महिला कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार केला गेला.

प्रमुख पाहुणे म्हणून डी. वाय. एस. पी. स्वाती गायकवाड आणि महिला कार्यकर्त्या तनुजा शिपुरकर उपस्थित होत्या. गायकवाड मॅडमनी आपल्या करिअर बरोबरच मुलं घडवणं ही महिलांची प्राथमिक जबाबदारी असल्याचं विशद केलं. चांगली मुलं घडली तर चांगला देश तयार होईल महिलांसाठी चांगले दिवस येतील. आपली मुलं घडवणं हे आईच्याच हातात असतं त्यामुळे मुलांची संवाद कसा साधावा याचे काही मूलमंत्र गायकवाड मॅडमनी दिले. शिपुरकर मॅडमनी महिलांमध्ये काम करत असताना महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव कशी असावी, त्याचप्रमाणे स्त्रीभ्रूणहत्या ही किती गंभीर समस्या आहे आणि ती आपण सर्वांनी मिळून सोडवणं किती गरजेच आहे याचा महत्त्व विशद केलं. त्यानंतर सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासंदर्भात शपथ घेतली. या कार्यक्रमानिमित्त ग्लोब इंडिया कंपनीतर्फे सर्व कर्मचाऱ्यांना सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप केले.

कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये वाशी उपकेंद्राचे अनिल गमरे तसेच सावलीचे ऋषिकेश डोंगळे, योगेश चव्हाण, सौरभ शेवाळे, कुणाल सरावणे, स्वप्निल ठोंबरे, संयम कळस्कर, राहुल शिरसाट यांनी महत्त्वाचे योगदान दिले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.