आरोग्य व शिक्षण

डोंगरगावच्या युवा शेतकऱ्याची यशोगाथा!!ऊस एक एकरामध्ये तब्बल 95 टन तर कांदा एक एकरामध्ये विक्रमी 20 टनाचे उत्पादन!!

डोंगरगावच्या युवा शेतकऱ्याची यशोगाथा!!

ऊस एक एकरामध्ये तब्बल 95 टन तर कांदा एक एकरामध्ये विक्रमी 20 टनाचे उत्पादन!!

डोंगरगाव : डोंगरगाव मध्ये येथील युवा शेतकरी श्री विठ्ठल( आप्पा ) सोपान डोमाळे यांनी ऊस उत्पादनामध्ये एकरामध्ये तब्बल 95 टनाची विक्रमी उत्पादन घेतले त्यामुळे परिसरातील सर्व शेतकऱ्यांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे तसेच पाठीमागील महिन्यात त्यांनी कांदा पीक तब्बल एकरामध्ये 20 टन उत्पादन घेऊन कांद्याचा उच्चांक उत्पादन करण्याचा विक्रम केला नेहमीच प्रगतशील शेतीमध्ये त्यांचे नाव पंचक्रोशी मध्ये गाजलेले आहे नियोजित शेती योग्य खताचे नियोजन पाण्याचे पद्धतशीर केलेले व्यवस्थापन या सर्वांमुळे उत्पादनामध्ये वाढ करण्यात त्यांना यश आले त्यांनी आजपर्यंत उसाचे सलग 1,2,3,4,5,6 खोडवा विक्रमी पिकांचे उत्पादन घेतलेले आहे तसेच यापूर्वी त्यांनी उसाचे तब्बल 72 कांड्यापर्यंत उत्पादन घेतलेले आहे या शेती कामांमध्ये मार्गदर्शन करणारी आई वडील, मदत करणारे लहान बंधू श्री धनंजय सोपान डोमाळे (प्राध्यापक कनिष्ठ महाविद्यालय वाघोली) तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे दाजी श्री राहुल दत्तोबा गडदे (पोलीस पाटील डोंगरगाव) हे करत असतात. त्यांचे तरुणांना सांगणे आहे की आपल्या आवडीचे क्षेत्र निवडा नाहीतर ज्या क्षेत्रात झाल तिथे आपली आवड निर्माण करा.त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा सल्ला दिला आहे शेती सोडून इतर ठिकाणी नोकरी करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु नोकरी करण्यापेक्षा शेतीतून योग्य व्यवस्थापन केल्यास शेती नेहमी फायदेशीर ठरत असते हे त्यांच्या या उदाहरणातून दिसून आले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.