आरोग्य व शिक्षण

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी(जारकरवाडी) येथे शाळा पुर्व मेळावा उत्साहात झाला संपन्न!!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी(जारकरवाडी) येथे शाळा पुर्व मेळावा उत्साहात झाला संपन्न!!

आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गावं म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडी गावातील जिल्हा परीषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी येथे इयत्ता पहिली प्रवेश व शाळापूर्व तयारीच्या निमित्ताने सर्व पालक,ग्रामस्थ, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत शैक्षणिक वर्ष २०२३ -२०२४ साठी इयत्ता पहिलीचा शाळापूर्व तयारी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांचा व त्यांच्या पालकांचा शालापूर्व तयारी मेळावा आज दि . २८ एप्रिल २०२३ रोजी पार पडला.यावेळी ढोल-ताशाच्या गजरात चिमुकल्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच त्यांचे औक्षण करून पुष्प देण्यात आले. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.विजय थोरात यांनी मेळाव्याचे स्वरूप सांगून सर्वांचे स्वागत केले.मा.उपसभापती, भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. रामचंद्र जयराम ढोबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.नाव नोंदणी,भाषिक विकास गणन, पूर्व तयारी,सामाजिक भावनिक विकास यानुसार मुलांबरोबर संवाद साधण्यात आला. सदर प्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष काळूराम निवृत्ती टाव्हरे व सर्व सदस्य उपस्थित होते.मच्छिंद्र पोपट वणवे,दिपक काशिनाथ ढोबळे, नामदेव बापू वणवे,सतिश रामदास ढोबळे यांच्या सह मोठ्या संख्येने पालक देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या सहशिक्षिका सौ.वैजयंता विजय थोरात, अंगणवाडी ताई ताराबाई शिवाजी पाचपुते, निर्मला देविदास पाचपुते यांनी केले.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.