आरोग्य व शिक्षण

आंबेगाव तालुक्यातील मांदळेवाडी येथे श्री अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता.!!

मांदळेवाडी येथे श्री अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता.!!

लोणी-धामणी -आजचा तरुण वर्ग अध्यात्माकडे वळला आहे. हि मोठी गौरवाची व कौतुकाची बाब आहे.त्यामुळे या तरुण वर्गाने आपल्या आईवडीलाच्या सेवेत प्रमेश्वर शोधला पाहिजे.शिवाय आई वडिलांची सेवा करून इतर तरुणान समोर एक आदर्श निर्माण केला पाहिजे.असे प्रतिप्रादन मांदळेवाडी (ता.आंबेगाव) येथे काल्याच्या किर्तनरुपी सेवेत ह.भ.प.सुनिल महाराज झांबरे ( बीड ) यांनी केले. मांदळेवाडी येथे श्री हनुमान मंदिराच्या वर्ष २९ व्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते.त्यावेळी काल्याच्या सांगता समारोप प्रसंगी ह.भ.प. झांबरे महारज बोलत होते.या हरिनाम सप्ताहाचे वैशिष्टये म्हणजे दररोज हरिकिर्तनानंतर संपूर्ण गावाला सातही दिवस महाप्रसादाचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे गेली २८ वर्षे हा सप्ताह सुरु असून येथील ग्रामस्थांच्या एकजूटीचे खरोखर कौतूक होत आहे.या अखंड हरिनाम सप्ताहाचे नियोजन समस्त ग्रामस्थ मांदळेवाडी,मुंबई, पुणेकर मंडळीनी केले होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.