आरोग्य व शिक्षण

धामणी(ता.आंबेगाव) येथील साई संपत विधाटे याची भारतीय सैन्यात टेक्निकल विभागात निवड!!

धामणी येथील साई विधाटे याची भारतीय सैन्यात टेक्निकल विभागात निवड!!

सर्वांचा युवा सहकारी मल्हारी भक्त स्पोर्ट क्लब चा सदस्य आणि एक होतकरू तरुण कु.साई संपत विधाटे याची आज भारतीय सैन्य दलात टेक्निकल विभागात नियुक्ती झाली. एका गरीब कुटुंबातील या मुलाने अतिशय कष्टाने आणि मेहनतीने हे यश संपादन केले आहे. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर कुटुंबाची आलेली जबाबदारी आणि परिस्थितीची जाण या सगळ्याचा विचार करून गेली तीन चार वर्षे या तरुणाने मेहनत घेऊन हे यश संपादन केले आहे. परिसरातून त्याचे कौतुक होत आहे.

आज साईचा सत्कार धामणी गावच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ.रेश्माताई अजित बोऱ्हाडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. तसेच त्याला पुढील कार्यासाठी आणि देशसेवेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिरदाळे गावचे उपसरपंच श्री.मयुर सरडे, युवा उद्योजक श्री.सचिनशेठ बोऱ्हाडे,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.सिताराम जाधव (इंडिया टेलर),राष्ट्रवादी युवक अध्यक्ष चेतनदादा रोडे,ख.वि.संघ शाखा अधिकारी अक्षय रोडे, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब करंडे,हॉटेल सोमनाथचे मालक अविशेठ बोऱ्हाडे,कल्पेश वाघ तसेच महिला भगिनी शबाना इनामदार,गंगुबाई वाळुंज या उपस्थित होत्या.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.