आरोग्य व शिक्षण

गणेश, रमेश….. सलाम तुमच्या कर्तुत्वाला!!

गणेश, रमेश….. सलाम तुमच्या कर्तुत्वाला!!

नेतृत्व,कर्तुत्व,दातृत्व, परोपकार कोणाकडूनही कधीचं उसने घेता येत नाही हे गुण उपजतच अंगी असावे लागतात. लोकांच्या हितासाठी आणि मदतीसाठी काही लोकं कुठल्याही फळाची अपेक्षा न करता नेहमीचं पूढे येत असतात, अशाच लोकांपैकी एक म्हणजे गणेश बाबाजी बढेकर आणि रमेश मांदळे!!

आंबेगाव तालुक्यातील पुर्व भागात आज दुपारी 4 च्या नंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला. भरीत भर म्हणून की काय गाराही बरसल्या!! या जोरदार वादळात लोणी – मंचर मार्गावरील डिंभे धरणाच्या कॅनॉल लगत माऊली मंदिराच्या अलीकडे एका वळणावर रस्त्याच्या कडेला असणारी कडुलिंबाची व इतर झाडे उन्मळून पडली होती. आधीच जोरदार वारे, त्यात पडणारा गारांचा पाऊस या परस्थितीत एखादा वाहनचालक घराच्या ओढीने घाई-घाई निघाला असताना अपघात होण्याची शक्यता होती. गणेश बढेकर,रमेश मांदळे यांनी परस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वयंस्फूर्तीने स्वतःचा ट्रॅक्टर आणुन ऐन पावसात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पडलेली झाडे बाजूला केली आणि प्रवासासाठी रस्ता मोकळा करुन दिला.

स्वार्थासाठी हापापलेली माणसे आपणं सर्रास पाहतो,पण निस्वार्थपणे समाजसेवेसाठी वाहून घेतलेली मोजकीच!! रमेश आणि गणेश हे अशा निस्वार्थी लोकांपैकी एक!! गणेश, रमेश सलाम तुमच्या कर्तुत्वाला!!

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.