आरोग्य व शिक्षण

भैरवनाथ—जोगेश्वरी उत्सवानिमित्त धामणी(ता.आंबेगाव) येथे धार्मिक कार्यक्रम संपन्न!!

भैरवनाथ— जोगेश्वरी उत्सवानिमित्त
धामणीत धार्मिक कार्यक्रम संपन्न!!

धामणी (ता.आंबेगांव) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ—जोगेश्वरी उत्सवानिमित्त फाल्गुन कृष्ण त्रयोदशीला धार्मिक कार्यक्रमाचे व पालखीचे आयोजन करण्यात आले होते.
सोमवारी सकाळी श्रीची महापूजा देवस्थानाचे परंपरागत सेवेकरी समस्त रोडे मंडळीच्या हस्ते करण्यात आली. रात्री काळभैरवनाथाच्या व जोगेश्वरीच्या पंचधातूच्या मुखवट्याची पालखीतून छबिना मिरवणूक धामणीच्या समस्त पंचरास मंडळीच्या पारंपारीक ताफ्यातील हालगी,ढोलकी,सनई,संबळ,तुतारी,व ताशाच्या निनादात वाजतगाजत भंडार्‍याची उधळण करुन काढण्यात आली.

यावेळी भैरवनाथाचा चांगभलं च्या जयघोषात पालखीचे धामणीच्या पेठेत ग्रामस्थांनी उत्साहाने स्वागत करुन दर्शन घेतले देवाच्या पालखीच्या मिरवणूकीत समस्त रोडे जथेकरी मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते देवाची पालखी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात पोहोचल्यानंतर खंडोबाची व भैरवनाथाची जोगेश्वरीची आरती करण्यात आली.यावेळी ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराचे शिखराचे दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले असून शिखराचे रंगभरणीचे काम लवकरच धामणी ग्रामस्थाच्या लोकवर्गणीतून सुरु करण्यात येऊन मंदिराच्या शिखराचे कलशारोहन करण्याचा व त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा निर्णय यावेळी भंडारा उधळून घेण्यात आला असल्याचे व भैरवनाथ मंदिराची दगडी संरक्षक भिंत पूर्णपणे ढासळलेली आहे या “एल” आकाराच्या दगडी संरक्षक भिंतीचे काम खूप मोठ्या खर्चाचे असल्याने त्याची पूर्तता करण्यासाठी माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे रोडे मंडळीनी यावेळी सांगितले.

यावेळी लक्ष्मण रोडे,आबाजी रोडे,बाळकृष्ण रोडे,बबनराव रोडे,कैलासराव रोडे,बबन गेनभाऊ जाधव,हनुमंत जाधव,एकनाथ भिका जाधव,शांताराम रोडे,गोपाळ रोडे सर,हनुमंत रोडे,संदीप रोडे,अनिकेत रोडे,बाळू रोडे,सचिन रोडे,निकेश रोडे,दत्ता रोडे,सूर्यकांत रोडे,निलेश रोडे,सिताराम जाधव वाघे,माऊली जाधव वाघे,दिनेश जाधव,नामदेव पवार,पमाजी पंचरास उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.