आरोग्य व शिक्षण

कृषि वीजपंपांना उच्चदाबाने वीजपुरवठा द्या .. कांडगाव परिसरातील सहकारी संस्थेचे महावितरण निवेदन!!

कृषि वीज पंपांना उच्च दाबाने वीज पुरवठा द्या .. कांडगाव परिसरातील सहकारी संस्थेचे महावितरण निवेदन!!

कांडगाव ,वाशी ,शेळकेवाडी ,देवाळे,कळंबा या परिसरातील कृषी वीज पंपांना कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे यामुळे हजार एकर वरील पिके धोक्यात येत असून गेली दोन वर्ष याकडे महावितरण कार्यालयाने दुर्लक्ष होत असून कृषी पंपांचा विद्युत पुरवठा उच्च क्षमतेने व्हावा या मागणीसाठी चहा गावातील सहकारी पाणीपुरवठा व खाजगी पूर्व पाणीपुरवठा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी कांडगाव तालुका करवीर येथील महावितरणचे कांडगाव येथील कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता दिपक चव्हाण यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले निवेदनात पुढे म्हटले आहे की  चार ते पाच गावातील सहकारी व खाजगी पाणी पुरवठा संस्थाच्या कृषी पंपाना कोथळी येथील सबस्टेशन येथून वीज पुरवठा केला जातो .दिवस, रात्रीचा विद्युत पुरवठा कमी दाबाने मिळत असल्याने   अनेक विद्युत मोटारी जळाल्या आहेत. वीज पुरवठा कमी दाबाने मिळत असल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने सहकारी संस्थेच्यावतीने पिकांना योग्य वेळी पाणी देणे शक्‍य नसल्याने हजारो एकरावरील पिंके धोक्यात आली असून येत्या आठ दिवसात हा कमी दाबाने मिळणार वीज पुरवठा सुरळीत करावा  अशी मागणी  देवाळे ,कांडगाव ,वाशी,कळंबा ,शेळकेवाडी परिसरातील सहकारी संस्थाच्या पदाधिकारी यांनी केली आहे . यावेळी दिगंबर मेडसिंगे , प्रा.निवास पाटील ,विकास पाटील , निवास पाटील रणजित पाटील ,भिकाजी शिंदे,केशव पाटील , विश्वास पाटील याच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी,सचिव उपस्थित होते.  उच्च दाबाने कृषी पंपाना वीज पुरवठा द्यावा या मागणीसाठी कांडगाव येथील महावितरण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता दिपक चव्हाण यांना निवेदन देताना दिगंबर मेडसिंगे ,प्रा.निवास पाटील , भिकाजी शिंदे , रणजित पाटील ,व इतर

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.