सामाजिक

लुपिन फाउंडेशनतर्फे १३३ शेतकऱ्यांना तुषार सिंचन संचांचे वाटप ; लोणी, राणमळा व पोंदेवाडी येथील शेतकऱ्यांना दिलासा; पाण्याचे काटेकोर नियोजन होण्यास मदत !!

1011848440
1011848442

पंचनामा प्रतिनिधी – लोणी : लुपिन ह्यूमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन, पुणे आणि इलिका पी. बी. व्हर्लपूल किचन अप्लायन्सेस प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘उपजीविका विकासासाठी जलसंसाधन प्रकल्पा’ अंतर्गत आंबेगाव तालुक्यातील लोणी, राणमळा व पोंदेवाडी येथील १३३ शेतकऱ्यांना तुषार सिंचन संचांचे वाटप करण्यात आले. प्रत्येक शेतकऱ्याला एक एकर क्षेत्रासाठी हे संच वितरित करण्यात आले.

सध्या निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीत या तुषार सिंचन संचांचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून, उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करून कमी पाण्यात शेती करणे शक्य होणार आहे.

दरम्यान, गेल्या दीड वर्षात लुपिन फाउंडेशनच्या माध्यमातून परिसरात जलसंधारणाची विविध कामे करण्यात आली आहेत. यामध्ये आठ सिमेंट बंधाऱ्यांची उभारणी, गावातील तीन पाझर तलावांमधील गाळ काढणे, तसेच जिल्हा परिषद शाळा लोणी आणि उपबाजार समिती मंचरच्या लोणी बाजार आवारात रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे करण्यात आली आहेत. या कामांमुळे भूजल पातळी वाढण्यास मदत झाली आहे.

तुषार सिंचन संच वितरण कार्यक्रमास प्रदीप वळसे पाटील (संचालक, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, पारगाव), राणमळा गावचे सरपंच राजेंद्र सिनलकर, उपसरपंच संतोष सिनलकर, पोलीस पाटील रुपेश सिनलकर, संतोष सिनलकर, तसेच पोंदेवाडी गावचे माजी सरपंच, ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

1011848441

यावेळी लुपिन फाउंडेशनचे प्रताप मोटे यांनी तुषार सिंचन संचांच्या माध्यमातून भाजीपाला पिकांना पाणी देऊन कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच फिनोलेक्सचे रोहित कदम व संभाजी कठाळे यांनी तुषार सिंचन संचांची जोडणी, नियोजन आणि योग्य वापर याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली.

लुपिन फाउंडेशनचे वर्कसाईड हेड व्यंकटेश शेटे व संदीप झणझणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. सहाय्यक कार्यक्रम अधिकारी बाळासाहेब बोऱ्हाडे व मच्छिन्द्र खरात यांची यावेळी उपस्थिती होती.

जलसंधारणाच्या कामांसोबतच आधुनिक सिंचन पद्धतीचा प्रसार केल्याने परिसरातील शेतकऱ्यांना पाणी बचतीसह शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी निश्चितच हातभार लागणार आहे.

1011822280

Related posts

सुदृढ माती हीच समृद्ध शेतीची गुरुकिल्ली आहे; माती परीक्षण म्हणजे उत्पादनवाढीचा शास्त्रशुद्ध पाया ;जवळे (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथे वाळुंज फार्मवर माती परीक्षण व जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न !!

Chief Editor

भीमाशंकरकडून रु.१७७/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा !!

Chief Editor

मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत खेळाडू निवड चाचणी होणार १४ व १५ जुलै रोजी !!

Chief Editor

Leave a Comment