राजकीय

लांडेवाडी(ता.आंबेगाव) येथे आंबेगाव तालुका बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची बैठक मा. खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न!!

लांडेवाडी येथे बैठकीत बोलताना माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यापासून शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक भागामध्ये विकासकामे सुरू होऊन रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळाली आहे. शिवसैनिकांनी आपल्या गावातील समस्या मार्गी लावून त्याद्वारे नागरिकांचा उत्कर्ष साधण्यासाठी पुढाकार घ्यावा,असे आवाहन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.

लांडेवाडी(ता.आंबेगाव) येथे आंबेगाव तालुका बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची बैठक माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित शिवसैनिकांना व पदाधिकाऱ्यांना माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पक्ष वाढीसाठी मार्गदर्शन केले.तसेच प्रत्येक भागातील शिवसैनिकांशी संवाद साधून त्या त्या भागातील अडचणी व समस्या समजून घेतल्या.

आढळराव पाटील म्हणाले,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक भागामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू झाली असून रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळाली आहे.मुख्य म्हणजे अनेक वर्षांपासून संघर्ष करत आलेल्या माझ्या शिवसैनिकाला शासकीय-प्रशासकीय पातळीवर हक्काची ताकद मिळाली आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी आपापल्या गावातील लोकांची कामे व समस्या मार्गी लावण्यासाठी व त्याद्वारे नागरिकांचा उत्कर्ष साधण्यासाठी पुढाकार घ्यावा.प्रत्येक भागात तरुण कार्यकर्त्यांचे संघटन करावे असे आवाहनही आढळराव पाटील यांनी सर्व शिवसैनिकांना केले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर, तालुकाप्रमुख अरुण गिरे,माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले,सचिन बांगर यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी कल्पनाताई आढळराव पाटील,उपजिल्हाप्रमुख सुनील बानखेले,भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे,संचालक योगेश बानखेले,लक्ष्मण काचोळे, शिवाजी राजगुरू,प्रवीण थोरात, सुरेशराव घुले,सुभाष पोकळे, बापूसाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.