आरोग्य व शिक्षण
श्री पारेश्वर देवस्थान पारगाव (शिंगवे) येथे महाशिवरात्री निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन!!

श्री पारेश्वर देवस्थान पारगाव (शिंगवे) येथे महाशिवरात्री निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन!!
आंबेगाव तालुक्यातील पारगाव (शिंगवे) येथे महाशिवरात्री निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समस्त ग्रामस्थ पारगाव (शिंगवे) यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
महाशिवरात्री निमित्ताने पहाटे 4 ते सकाळी 8 वाजेपर्यंत अभिषेक, 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत फराळ वाटप तसेच सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत भजनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
पारेश्वर मंदिर हे पुरातील पुरातन काळातील मंदिर आहे पारेश्वर मंदिरावरून पारगाव हे नाव देण्यात आले आहे.
या प्रसंगी सर्व भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.