सामाजिक

शिंगवे येथे दर पौर्णिमेला भैरवनाथ पालखी सोहळा ; वारकरी विद्यार्थ्यांचा सहभाग; ग्रामस्थांकडून पालखीचे स्वागत !!

img 20260926 wa0594

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथील जोगेश्वरी भैरवनाथ मंदिर परिसरात दर महिन्याच्या पौर्णिमेला भैरवनाथ पालखी सोहळा उत्साहात पार पडतो. ह.भ.प. विठ्ठल महाराज पाबळे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी या उपक्रमात सहभागी होत असून, पालखीच्या माध्यमातून गावात वारकरी संस्कृतीचा जागर केला जात आहे.

पौर्णिमेच्या दिवशी भैरवनाथ मंदिरापासून पालखीला सुरुवात होते. विद्यार्थी टाळ-मृदंगाच्या साथीने अभंग, भजन व नामस्मरण करत पालखीची संपूर्ण गावातून प्रदक्षिणा घालतात. गावातील विविध ठिकाणी ग्रामस्थ पालखीचे दर्शन घेत स्वागत करतात. त्यामुळे या उपक्रमाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 390586

दर महिन्याला पालखी काढण्यामागे विद्यार्थ्यांना वारकरी परंपरेतील शिस्त, सामूहिक सहभाग आणि भक्तीमय वातावरणाचा अनुभव मिळावा, तसेच गावातील नागरिकांना एकत्र येण्याची संधी मिळावी, हा उद्देश आहे. वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांचा या उपक्रमातील नियमित सहभाग हे या पालखी सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरत आहे.

1011080923

पालखी सोहळ्यादरम्यान ग्रामस्थांकडून संस्थेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी चहा-पाणी तसेच अल्पोपहाराची व्यवस्था केली जाते. गावकऱ्यांच्या या सहकार्यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्यात आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे. धार्मिक कार्यक्रमासोबतच गावातील सामाजिक एकोपा आणि परस्पर सहकार्याची भावना वृद्धिंगत करण्याचे काम या उपक्रमातून होत आहे.रामदास महाराज मेहत्रे,गणेश जगताप ,बाबाजी गाढवे ,नानाभाऊ वाव्हळ,कल्याण ढोबळे ,किसन मेहेत्रे ,पंढरीनाथ वाव्हळ ,शहाजी वाव्हळ ,ज्ञानेश्वर साळी ,शंकरनाना कासार ,कैलास हाटकर , पंकज मेहेत्रे,गणपत तागड यांचे या उपक्रमासाठी विशेष प्रयत्न असतात.

“दर महिन्याच्या पौर्णिमेला पालखी काढण्यामुळे विद्यार्थ्यांना वारकरी संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो. ग्रामस्थांचे मिळणारे सहकार्य आणि उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा उपक्रम सातत्याने सुरू आहे,” अशी माहिती ह.भ.प. विठ्ठल महाराज पाबळे व ह.भ.प. कु. मोहिनीताई पाबळे यांनी दिली.

Related posts

रानमळा (ता.आंबेगाव ) येथे धर्मनाथ महाराजांच्या (बीज) यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न!!

Chief Editor

ग्रामोद्योग भरारी पुरस्कारासाठी २८ जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Chief Editor

वाळव्याचा बहुमान सर्वदूर नेणारा कलायात्री : विनोदसम्राट गुलाबराव बोरगावकर

Chief Editor

Leave a Comment