सामाजिक

ढोल-ताशांच्या निनादात आंबेगाव तालुक्यात गणरायाला भावपूर्ण निरोप !!

1011083945

आंबेगाव : ढोल-ताशांचा निनाद, टाळ-मृदंगाचा ठेका, भक्तिगीतांचा गजर आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात आंबेगाव तालुक्यात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. कळंब, चांडोली, लौकी, एकलहरे, पिंपळगाव, निरगुडसर, अवसरी, पारगाव, जारकरवाडी, लोणी-घामणी, वडगावपीर, लाखणगाव आदी गावांत गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुका उत्साहात काढण्यात आल्या.

गणेशोत्सवाच्या सांगतेच्या दिवशी सकाळपासूनच विविध गणेश मंडळांच्या परिसरात विसर्जनाची लगबग सुरू होती. गणरायाची विधिवत पूजा, आरती व नैवेद्य अर्पण केल्यानंतर विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली. ढोल-ताशा, लेझीम आणि भक्तिगीतांच्या तालावर युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बालगोपाळांनीही मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

1011084024

लौकीत विविध मंडळांचा सहभाग : लौकी येथे सुवर्णमहोत्सवी श्री गवळीबाबा सार्वजनिक गणेश व नवरात्र उत्सव मंडळ (मधला मळा), जय गणेश व दुर्गामाता मित्र मंडळ (गावठाण), श्री भैरवनाथ नवतरुण मंडळ (भैरवनाथवाडी), वाघजाई गणेश मंडळ (दरेकरवस्ती), नागनाथ गणेश मंडळ आणि मोरया मित्रमंडळ (काळेमळा) यांच्या वतीने गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी ठिकठिकाणी गणरायाचे दर्शन घेतले.

गणेशोत्सव काळात मंडळांच्या वतीने आरती, भजन, प्रवचन, कीर्तन, जादूचे प्रयोग, विविध स्पर्धा तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतून धार्मिक वातावरणाबरोबरच सामाजिक एकोपा आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी नियोजन केले होते. भक्तीमय वातावरणात आणि शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणुका पार पडल्या. अखेर ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!’ या जयघोषात गणरायाला निरोप देण्यात आला. डोळ्यांत विरहाची ओल आणि पुढील वर्षीच्या आगमनाची आस ठेवत आंबेगाव तालुक्यातील गणेशोत्सवाची उत्साहात सांगता झाली.

1011083945

लौकी (ता. आंबेगाव) : गणेशोत्सवाच्या सांगतेनिमित्त काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या महिला भाविक.

लौकी (ता. आंबेगाव) : भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पाला निरोप देताना गणेशभक्त.

1011080923
1011066487

Related posts

म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या ;सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

Chief Editor

गावडेवाडीत ‘पंढरीची वारी’ देखावा ठरतोय आबालवृद्धांचे आकर्षण

Chief Editor

शेतकरी कुटुंबातील मुलगा ते पत्रकारिता; तेजसचा प्रेरणादायी प्रवास !!

Chief Editor

Leave a Comment