सामाजिक

न्यू एरा हॉस्पिटलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

1010339564
1010339564

पंचनामा प्रतिनिधी- :नागपुरातील रामदासपेठ येथील न्यू एरा हॉस्पिटलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सायंकाळी झाले. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

पगारिया समूह आणि प्रेमजी इन्व्हेस्ट यांच्या पाठबळावर उभारलेली ही आरोग्यसंस्था आहे. उत्कृष्ट वैद्यकीय सेवा, नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि रुग्णांविषयी करुणाभाव या तत्त्वांवर आधारित न्यू एरा हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर आणि जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

  एकाच छताखाली सर्वसमावेशक, रुग्णकेंद्रित आरोग्यसेवा देण्याच्या उद्देशाने हे रुग्णालय उभारण्यात आले असून, प्रगत निदान सेवा, अतिदक्षता विभाग, आपत्कालीन सेवा, अवयव प्रत्यारोपण, न्यूरोसायन्सेस, माता व बाल आरोग्य सेवा, रोबोटिक शस्त्रक्रिया तसेच विविध सुपर स्पेशालिटी सेवा येथे उपलब्ध असतील. 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी येथील आरोग्य सुविधांची पाहणी करून रुग्णालयाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रुग्णालयाच्या माध्यमातून प्रदेशातील दर्जेदार आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. 

 या उद्घाटन सोहळ्याला नामवंत डॉक्टर, आरोग्य क्षेत्रातील नेते, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

 आरोग्यसेवा, वैद्यकीय नवोपक्रम आणि संस्थात्मक उत्कृष्टतेसाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवर वैद्यकीय तज्ज्ञ आणि धोरणात्मक भागीदारांचा याप्रसंगी गौरव करण्यात आला.

 यामध्ये पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. निधीश मिश्रा, डॉ. निलेश अग्रवाल, डॉ. राहुल सक्सेना, डॉ. आनंद भुतडा,  डॉ. अतिश बाकणे, डॉ. अलंकार रामटेके यांच्यासह अन्य मान्यवरांचा समावेश होता.
     
1010339562

Related posts

गुरुकुलचा समर्थ शेळके बारावी सी.बी.एसई.बोर्डामध्ये जुन्नर-आंबेगाव तालुक्यातून प्रथम !!

Chief Editor

समर्थ ज्युनिअर कॉलेज, बेल्हेचा एम.एच.टी.-सीईटी २०२६ मध्ये यश !!

Chief Editor

मांदळेवाडीत बिबट्याचा वाढला वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण ; वडगावपीर-मांदळेवाडी रस्त्यावर रात्री बिबट्याचे दर्शन; वनविभागाने पिंजरा लावण्याची मागणी !!

Chief Editor

Leave a Comment