सामाजिक

अखेर आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात पावसाची दमदार हजेरी !!

1009552090

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील जारकरवाडी, लोणी, धामणी लाखणगाव, पोंदेवाडी परिसरात रविवारी मान्सून पावसाने दमदार हजेरी लावली ज्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या वर्षी २० जून उजाडली तरी या परिसरात समाधानकारक पाऊस झाला नव्हता.साहजिकच शेतकऱ्यांमधे चिंता पसरली होती.आज झालेल्या पावसामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे.

गेले अनेक दिवस पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी, सर्वसामान्य नागरिक चिंतेत होत.त्यात वाढते तापमान आणि तीव्र उकाड्यामुळे अधिक असल्याने सर्वसामान्य लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. मान्सूनच्या आगमनामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये चैतन्य पसरले आहे.

आज दिवसभर आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी चार नंतर लोणी, धामणी, जारकरवाडी, पोंदेवाडी आणि लाखणगाव परिसरात ढगांच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे बळीराजाची तारांबळ उडाली.

पहिल्याच जोरदार पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.दरम्यान, पावसाअभावी रखडलेली पेरणीपूर्व मशागतीची कामे आता वेगाने मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आशेचे भाव उमटले असून खरीप हंगामाबाबत नव्याने आशावाद निर्माण झाला आहे.

1009881998
1009850407
1009828034

Related posts

विज्ञान दिनानिमित्त खोडद येथील ‘जीएमआरटी’ प्रकल्पास पारगाव (शिंगवे ) येथील विद्यार्थ्यांची भेट !!

Chief Editor

श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाच्या उत्सव समिती अध्यक्षपदी जगदीश हिरेहब्बू

Chief Editor

महाराष्ट्र राज्य शाहीर संघटनेचे अध्यक्ष, तुरेवाले शाहीर रामदास नाथाजी गुंड यांचे दुःखद निधन

Chief Editor

Leave a Comment