सामाजिक

समर्थ जुनिअर कॉलेजचा निकाल १०० टक्के;इकरा फातिमा वसीउल्ला मलिक ९० टक्के गुणांसह प्रथम !!

img 20260504 wa0226

पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ज्युनिअर कॉलेज, बांगरवाडी (बेल्हे) येथील एच.एस.सी. बोर्ड परीक्षा २०२६ चा विज्ञान व वाणिज्य विभागाचा निकाल शंभर टक्के लागला असून महाविद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अशी माहिती प्राचार्या वैशाली आहेर यांनी दिली.
या परीक्षेत इकरा फातिमा वसीउल्ला मलिक हिने ९० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. वैष्णवी किरण येवले हिने ८२.८३ टक्के गुणांसह द्वितीय, तर रिद्धी विलास थिटे हिने ८१.८३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.

महाविद्यालयातून फेब्रुवारी-मार्च प्रमाणपत्र परीक्षा २०२५-२६ साठी एकूण २७८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये श्रुती भिमराज शिंदे (८१.६७%), आदिती दत्तात्रय कापसे (८१.५०%), साई गंगाराम काळे (८१.५०%), ओमकार दत्तात्रय गाडगे (८०.६७%), दर्शन अरुण गाडगे (८०.६७%), स्नेहल अशोक भंडलकर (८०%), अनुजा गणपत गांजवे (७९.६७%), सार्थक सागर कुंजीर (७९.६७%), ओमकार सखाराम गाडगे (७८.५०%), श्रुती दशरथ जोरी (७८.३३%), प्रतीक्षा संतोष गाडेकर (७८%), तनुजा सुनील भांबेरे (७७.८३%), मयुरी संतोष खराडे (७७.८३%), तनिषा जयराम खुटाळ (७७.८३%), अनुश्री प्रदीप चाळक (७७.५०%), ईश्वरी भोमा दाते (७७.३३%), दिव्या शांताराम औटी (७५.६७%), संचिता संतोष गुंजाळ (७५.३३%) यांचा समावेश आहे.तसेच प्रथम श्रेणीत ८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती विभाग प्रमुख प्रा. संतोष पोटे यांनी दिली.

img 20260504 wa0228

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी संस्था सदैव प्रयत्नशील असल्याचे संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सांगितले.

या यशासाठी विद्यार्थ्यांना प्रा. राजेंद्र नवले, प्रा. विनोद चौधरी, प्रा. अमोल खामकर, प्रा. संगीता रिठे, प्रा. रोहिणी औटी, प्रा. नूतन पोखरकर, प्रा. ऋतुजा थोरात, प्रा. श्वेता जाधव, प्रा. वैशाली ढाकोळ, प्रा. सोनल कोरडे, प्रा. सुरेखा पटाडे, प्रा. राहुल वाळुंज, प्रा. प्रतिमा आवटे, प्रा. नेहा बुगदे, प्रा. दिपाली भोर, प्रा. वंदना गोरडे, प्रा. सायली भोर, प्रा. सायली नवले, प्रा. स्वप्नील दाते, प्रा. रोहित जाधव, प्रा. सुकन्या हिंगे, प्रा. सोमनाथ कदम, प्रा. शुभांगी गुंजाळ, प्रा. संपत जाधव, प्रा. स्वाती खोडदे यांनी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत तसेच सर्व विभागांचे प्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

img 20260504 wa0116
fb img 1774661444136
fb img 1774661449199

Related posts

बादोल्यात रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा ५८ हजार रुपयांचा नोटाचा हार घालून अनोखा वाढदिवस साजरा !!

Chief Editor

पंचनामा विशेष – अष्टपैलू तमाशा कलावंत राधाकृष्ण राहूरीकर !!

Chief Editor

समर्थ आयटीआयच्या ४६ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये निवड !!

Chief Editor

Leave a Comment