आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

आपल्या पाल्याशी मित्र मैत्रिणी म्हणून संवाद साधा -संतोष देशमुख

आपल्या पाल्याशी मित्र मैत्रिणी म्हणून संवाद साधा -संतोष देशमुख

आपल्या पाल्याचे मित्र-मैत्रिणी म्हणून संवाद साधण्याचे आव्हान वाघोली येथील भारतीय जैन संघटनेच्या उच्च माध्यमिक विभागातील पालक सभेत बोलताना समुपदेशक व योग मार्गदर्शक श्री संतोष देशमुख यांनी केले. भारतीय जैन संघटनेच्या विद्यालयात इयत्ता अकरावी व बारावीच्या वर्गात शिकत असलेल्या पाल्यांच्या पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. पालक सभेचे अध्यक्षपदी प्राचार्य संतोष भंडारी हे होते.
श्री संतोष देशमुख यांनी पालकांना आपल्या पाल्याने सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घेणे, आरोग्याची काळजी घेणे व्यायाम, अवांतर वाचन इत्यादी विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्राचार्य संतोष भंडारी यांनी विद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच मोबाईल वापराचे दुष्परिणाम, विद्यालयात मुलांची, मुलींची घेत असलेली काळजी आदी विषयावर मार्गदर्शन केले. विद्यालयाचे पर्यवेक्षक पांडुरंग पवार यांनीही पालकांना विविध उदाहरणे देऊन पाल्यांच्या विकासासाठी बहुमोल मार्गदर्शन केले .उपप्राचार्य श्री गेठे सरांनी पुढील वर्षीच्या फी संदर्भातील माहिती दिली. विद्यालयातील शिक्षक श्री गणेश शिरसागर यांनी परीक्षा मूल्यमापन व 75 टक्के हजेरी याबाबत पालकांना सविस्तर माहिती दिली. यावेळेस विद्यार्थ्यांना विद्यालयात मोबाईल बंदी करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.पालक सभेचे नियोजन श्री ढोकले यांनी केले यावेळी व्यासपीठावर डॉ. गोविंद गोडसे, सौ पुनम सिंह पालक सभेचे पदाधिकारी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . या पालक सभेत बहुसंख्येने पालक उपस्थित होते पालक सभेचे सूत्रसंचालन सौ भोंडवे यांनी केले. तर आभार सौ अभिनया गायकवाड यांनी केले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.