बदलत्या हवामानाचा आंबा पिकावर होणार परिणाम!!
बदलत्या हवामानाचा आंबा पिकावर होणार परिणाम!!
बदलत्या हवामानामुळे गळू लागला आंब्याचा मोहोर!!
पारगाव प्रतिनिधी – संपूर्ण राज्यात सध्या थंडी पडली आहे. ही थंडी कांदा, बटाटा, गहू,हरभरा या पिकांसाठी पोषक असली तरी रात्री थंडी व दिवसा पडणारे उन यामुळे वातावरणात बदल झाला आहे. तसेच पहाटे धुके पडत आसल्याने त्याचा विपरीत परिणाम पिकांवर होत आहे. ज्यामुळे पिकांवर रोगराई चे प्रमाण वाढले आहे.
या बदलत्या हवामानाचा सर्वाधिक परिणाम झाला आहे तो आंबा या पिकावर… सध्या आंबा या पिकावर चिकट द्रव पडल्याने मोहोर गळून पडत आहे. मोहोर गळून पडल्याने पिकाच्या उत्पादनावर व परिणामी उत्पन्नावर ही परीणाम होणार आहे.
या वर्षी संपूर्ण राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. ज्यामुळे सध्या पाण्याची मुबलकता आहे. शेतात विवीध नगदी मालांची रेलचेल आहे. पण बदलत्या हवामानाचा फटका या पिकांना देखील बसणार असल्याची माहिती शेतक-यांनी पंचनामाशी बोलताना दिली.