आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी येथे भर लोकवस्तीत बिबट्याचा वासरावर हल्ला!!
शेतात नेऊन पाडला वासराचा फडशा!!
आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी येथे भर लोकवस्तीत बिबट्याचा वासरावर हल्ला!!
शेतात नेऊन पाडला वासराचा फडशा!!
आंबेगाव तालुक्यातील बारमाही बागायती गाव म्हणून संपूर्ण राज्यात ओळख असणाऱ्या जारकरवाडी गावात बिबट्याची दहशत काही केल्या संपायला तयार नाही. काल रात्री उशिरा प्रगतशील शेतकरी श्री.रामदास यशवंत ढोबळे यांच्या भरवस्तीत असणाऱ्या घरासमोरील गोठ्यातून बिबट्याने 3 महिने वयाच्या वासराचा शेतात फरफटत नेऊन फडशा पाडला.
जारकरवाडी परिसरात सध्या ऊसतोड सुरु आहे. त्यामुळे दडन क्षेत्र कमी होत चालले आहे. ज्यामुळे बिबटे मानवी वस्तीकडे वळू लागले आहेत. वडजादेवी मंदीर परिसर, घोडखणा, झांजूर्णेबाबा मंदीर परिसर, बोगद्या जवळील परिसर, डिंभे धरणाच्या कालव्या लगतच्या शेतात, ओढ्याच्या परिसरात अनेकदा लोकांना शेतात काम करत असताना बिबटे दिसून येतात. मात्र लोकांची चाहूल लागताच ते उसाच्या शेतात अथवा दाट झाडी झुडपात लपून बसतात अशी माहिती या परिसरातील शेतकऱ्यांनी पंचनामा शी बोलताना दिली.
या बाबत वनविभागाने त्वरीत लक्ष घालुन या परिसरात पिंजरा लावावा आणि कुठलाही अनुचित प्रकार घडण्याअगोदर बिबट्यांना जेरबंद करावे अशी आग्रही मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी पंचनामा शी बोलताना व्यक्त केली.