पारगाव तर्फे आळे येथे ऊस पाचट कुजवण्यासाठी प्रात्यक्षिक करून दाखवण्यासाठी कृषी अधिकारी पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर!!
पारगाव तर्फे आळे येथे ऊस पाचट कुजवण्यासाठी प्रात्यक्षिक करून दाखवण्यासाठी कृषी अधिकारी पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर!!
प्रतिनिधी -समीर गोरडे
तालुका कृषी अधिकारी जुन्नर गणेश भोसले व मंडल कृषी अधिकारी प्रमिला मडके यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती मयुरी चव्हाण यांनी श्रावण नढे गाव पारगाव तर्फे आळे ( झापवाडी)तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे ऊस पाचट व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतावर प्रात्यक्षिक करून दाखविले त्याचे फायदे तोटे समजून सांगितले व श्रीमती प्रमिला मडके मंडळ कृषी अधिकारी बेल्हे यांनी परिसरातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन केले की ऊस पाचट जाळून न टाकता ते कुजवण्याची प्रक्रिया करा जेणेकरून तुमच्या जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढेल व उत्पन्नात वाढ होईल उपस्थिती शेतकरी श्रावण नढे तानाजी नढे नारायण नाढे निलेश नढे राजेंद्र नढे अवधूत नढे अर्चना नढे विजय कसाळ आभार मानले..
पारगाव तर्फे आळे प्रात्यक्षिक करून दाखवताना शेतकरी..