पारगाव तर्फे आळे रामवाडी येथे कृषि विभाग व ग्रामस्थ यांच्या प्रयत्नातून झाले पाच वनराई बंधारे!! पाणी टंचाईवर झाली मात!!
पारगाव तर्फे आळे रामवाडी येथे कृषि विभाग व ग्रामस्थ यांच्या प्रयत्नातून झाले पाच वनराई बंधारे!! पाणी टंचाईवर झाली मात!!
प्रतिनिधी -समीर गोरडे
तालुका कृषी अधिकारी जुन्नर गणेश भोसले व मंडल कृषी अधिकारी प्रमिला मडके यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती मयुरी चव्हाण यांनी गाव पारगाव तर्फे आळे (रामवाडी)तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे सलग पाच वनराई बंधारे बांधले त्यामुळे परिसरातील शेतकरी यांचे विहिरीची बोरवेल पाण्याची पातळी वाढली,बंधार्यात चारीचे पाणी अडवून ते जिरवले गेल्यामुळे भूगर्भातील पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली असून डिसेंबर अखेर गेल्या वेळी बोरवेल यांची पाण्याची पातळी खूप कमी झाली होती परंतु वनराई बंधारे तयार केल्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली असून बोरवेल पाण्यात वाढ झाली असून या वर्षी जानेवारी फेब्रुवारी पर्यंत पाणीटंचाई भासणार नाही असे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले.
प्रमिला मडके यांनी उपस्थित शेतकरी यांना सांगितले कि पावसाचे वाहुन जाणारे पाणी वाया जाऊ नये म्हणून ओड्यांनवर आडवे बांध घालुन पाणी आडवुन ठेवावे यामुळे पाणी जमिनीत मुरते पाणी जमिनीत मुरल्याने आपल्याला भविष्यात पाणी टंचाईवर माता करता येईल.
यावेळी पारगाव गावचे उपसरपंच रामचंद्र डुकरे, शेतकरी राजाराम चौधरी, बजरंग डुकरे, दत्तात्रय येवले, अंकुश येवले,साहेबराव पारधी, हिरालाल चाहारे, उत्तम डेरे,प्रलय पिंपळे, फैजान मोमीन परीसरातील शेतकरी उपस्थित होते..