आरोग्य व शिक्षण

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी (जारकरवाडी) येथे शनिवार दि.२५ मार्च २०२३ रोजी संपन्न होणार वार्षिक स्नेहसंमेलन!!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी (जारकरवाडी) येथे शनिवार दि.२५ मार्च २०२३ रोजी संपन्न होणार वार्षिक स्नेहसंमेलन!!

आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी (जारकरवाडी) येथे शनिवार दि.२५ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजता वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न होणार असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक श्री. विजय थोरात यांनी पंचनामाशी बोलताना दिली.

या निमित्ताने शाळेतील अंगणवाडी, पहिली ते चौथीच्या बालचमुंच्या विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम संपन्न होणार आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी (जारकरवाडी) या शाळेने विविध अभिनव उपक्रम राबवले आहेत.दप्तरविना शाळा, आठवडे बाजार, आनंद मेळावा, बोलक्या भिंती, एक दिवस निसर्गासोबत, परिसर अभ्यास,तसेच जैविक शेती काळाची गरज, महीला सबलीकरण, या विषयांवर चर्चासत्र आदी उपक्रम यशस्वीपणे राबवले आहे.

मुलांच्या कला-गुणांना वाव मिळावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती सह शिक्षिका वैजयंता थोरात, अंगणवाडी ताई ताराबाई पाचपुते, निर्मला पाचपुते यांनी दिली आहे.

या कार्यक्रमाला सर्व पालक,ग्रामस्थ यांनी उपस्थीत रहावे असे आवाहन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष काळूराम टाव्हरे , उपाध्यक्ष सुरेखा लबडे यांनी केले आहे.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.