आरोग्य व शिक्षण

मांदळेवाडी (ता.आंबेगाव) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत चिमुकल्यांचा बालआनंद सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न!!

मांदळेवाडी शाळेत चिमुकल्यांचा कलाविष्कार!!

मांदळेवाडी (ता.आंबेगाव ) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत चिमुकल्यांचा बाल आनंद सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या निमिताने अजित सोनवणे यांच्या मार्गदर्शना खाली ” मातृपितृ पूजन सोहळा ” मोठ्या आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमानिमित्त शिष्यवृत्ती परिक्षेत पात्र ठरलेल्या अविष्कार बंगे व त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक किरण नरवडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे उध्दघाटन प्राचार्य अनिल शिंदे शिरूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस बबन शिंदे,जिल्हा उपनिबंधक राजेंद्र पालेकर सरपंच कोंडीभाऊ आदक,मेजर सुभाष पालेकर आदि मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले. या प्रसंगी चिमकूल्या विद्यार्थ्यांनी लावणी,कोळी गीते,भावगीते,भारूडे ” एकच एकच एकच बैलगाडा शर्यत ” असे विविध कार्यक्रम सादर करून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक सखाराम मुंजाळ,बाळासाहेब लोखंडे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गेनभाऊ बंगे, उपाध्याक्षा रूपाली मांदळे, विद्यार्थी व पालकांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमासाठी उपसरपंच नवनाथ मांदळे,माजी उपसरपंच माधूरी आदक, पिरभाऊ आदक,निकिता आदक,ग्रामपंचायत सदस्या व उद्योजिका ज्योती गोरडे,शशिकला पालेकर,फकिरा मांदळे,पोलीस पाटील काळूराम पालेकर,तंटामुक्तीचे अध्यक्ष सुनिल आदक, उपाध्यक्ष सचिन आदक,संचालक फकिरा आदक,पै.विजय आदक,पै.विश्वनाथ आदक,माजी सरपंच बापू आदक तसेच विविध संस्थांचे आजी माजी अध्यक्ष व विविध संस्थांचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते.सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण नरवडे व आभार सुजाता चिखले यांनी मानले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.