आरोग्य व शिक्षण

धामणी (ता.आंबेगाव) ग्रामस्थांनी जपले गावचे अनोखेपण!!कु.प्रकाश शिंदे या तरुणाची ठाणे पोलीस मध्ये निवड झाल्याबद्दल केला सन्मान!!

धामणी गावातील गरिब कुटूंबातील कु. प्रकाश शिंदे या तरुणाची ठाणे पोलीस मध्ये निवड झाल्याबद्दल ऐतिहासिक पंचांच्या पारावर पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, सरपंच रेश्मा बोऱ्हाडे, उपसरपंच संतोष करंजखेले, कैलास वाघ, ग्रामपंचायत सदस्य अक्षयराजे विधाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.विशेष सन्मान प्रकाश चे वडील शिवाजी शिंदे यांचा करण्यात आला.

पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले यांनी बोलताना सांगितले की अत्यंत प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन प्रकाश शिंदे ने मिळवलेल्या यशाचे कौतुक आहे. सर्व तरुणांनी प्रकाश चा आदर्श घ्यावा.
त्याप्रसंगी पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, सरपंच रेश्मा बोऱ्हाडे, उपसरपंच संतोष करंजखेले, मा सरपंच अंकुश भूमकर, मा. सरपंच सागर जाधव, तंटामुक्ती समिती अध्यक्ष नितीन जाधव, ग्रामपंचायत सदस्य अक्षयराजे विधाटे, मा. चेअरमन कांताराम तांबे,मा. चेअरमन गोविंद आण्णा जाधव, शरद जाधव, कैलास वाघ, मच्छिंद्र अमाप, संचालक कोंडिभाऊ तांबे, कोतवाल गणपत भंडारकर, सुहास रोडे, महेश वाघ, विठ्ठल तांबे, संतोष जाधव, रामचंद्र रणपिसे, योगेश विधाटे, वामनराव शिंदे, दत्ता रोडे, महेश चौधरी, बाळासाहेब भुमकर, सदाशीव गाढवे, सीलेमान पठाण, दत्तात्रय पंचरास व बहुसंख्येने धामणी, पहाडदरा, शिरदाळे व ज्ञानेश्वरवस्ती ग्रामस्थ उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.