आरोग्य व शिक्षण

समर्थ अभियांत्रिकी चे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धेत अव्वल!!

समर्थ अभियांत्रिकी चे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धेत अव्वल!!

समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,बेल्हे (बांगरवाडी) या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नुकताच राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धेत सहभाग घेतला होता.

जवाहर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड रिसर्च,नाशिक यांच्या वतीने आयोजित केलेल्या नॅशनल लेव्हल प्रोजेक्ट कॉम्पिटिशन अँड एक्झिबिशन मध्ये अंतिम वर्षातील कॉम्प्युटर इंजिनिअरिंग च्या माऊली भोर,अभिजीत थोरात,अविनाश भोर,माधुरी कंधारे या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘व्हॉईस बेस्ड ईमेल सिस्टीम फॉर ब्लाइंड पीपल’ या प्रकल्पास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याची माहिती कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा.स्नेहा शेगर यांनी दिली. समाजाभिमुख प्रकल्प तयार करण्यासाठी समर्थ शैक्षणिक संकुल नेहमी विद्यार्थ्यांनी प्रेरित करत असते आणि त्याचाच एक भाग म्हणून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांनी हे ॲप्लिकेशन वापरून अंध व्यक्तींना फार मोठी सोय करून दिल्याची माहिती प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर यांनी दिली.

या प्रकल्पामुळे अंध व्यक्तीला ई-मेल चा वापर करणे सोईस्कर होणार आहे.व्हॉईस कमांड चा वापर करून अंध व्यक्तींना ई-मेल सिस्टीम हँडल करणे,मेल सेंड करणे,आलेले मेल ऐकणे,त्या मेल ला रिप्लाय करणे,ठराविक मेल सर्च करणे इ. वेगवेगळे फिचर्स अनुभवता येणार आहेत.या विद्यार्थ्यांना प्रा.चौधरी यांनी मार्गदर्शन केले.

संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके व विश्वस्त वल्लभ शेळके यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.