आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीसामाजिक

सारवली(ता.आंबेगाव)गावात महिलांना गोधडी प्रशिक्षण!!

 

सारवली(आंबेगाव )गावात महिलांना गोधडी प्रशिक्षण.

प्रतिनिधी -समीर गोरडे आंबेगाव

आंबेगाव तालुक्यातील सावरली गावामध्ये गेल्या तिन वर्षांपासून ग्रामविकासाच्या संदर्भात रोटरी क्लब ऑफ मॅट्रो पुणे आणि वाॅटर संस्थेच्या माध्यमातून पाणी आढवा पाणी जिरवा, पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देणे, पाईप लाईन व्दारे नळपाणी पुरवठा करणे, विहीर व तळ्यांचे खोदकाम करून पाणीसाठा वाढविणे, शेती अभ्यास करून उत्पादन वाढविणे, शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणे, अशी विविध कामे करून या वर्षी सावरली गावात रोजगार उद्योजकता केंद्र उभे करून येथील महिलांना गोधडी शिवण्याचे प्रशिक्षण सुरू आहे,तर गेल्या वर्षी पिशव्या शिवण्याचे प्रशिक्षण दिल्याने अनेक कुंटूंबांना रोजगार उपलब्ध झाला.

सावरली गावात लोकांना कायम रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून गोधडी प्रशिक्षण आणि हातसडीची गिरण सुरू करून मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे.

यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्षा सुरेखा देशपांडे, मंकरद फडके,सुनिल गोखले, देशपांडे सर,वॉटर संस्थेचे कळसकर सर,पोलीस पाटील सुवर्णा पेकारी,तंटामुक्ती अध्यक्ष जानकू पेकारी, सरपंच अशोक पेकारी,बारखू केंगले, नामदेव भांगरे,भागाजी बागडे, संगीता भांगरे,ग्रामस्थ,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.