आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

शिरदाळे(ता.आंबेगाव) येथे नेत्र तपासणी शिबिरात शंभर रुग्णांची तपासणी!!

शिरदाळे(ता.आंबेगाव) येथे नेत्र तपासणी शिबिरात शंभर रुग्णांची तपासणी!!

आदर्श ग्रामपंचायत शिरदाळे व डॉ.मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर” शिरदाळे येथे संपन्न झाले.तब्बल शंभर रुग्णांनी यात सहभागी होत डोळ्यांची तपासणी केली. यात रुग्णांना कमी दरात चष्मा वाटप करण्यात आला. तर ज्यांना मोतीबिंदू आहे अशा पाच रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले. ही शस्त्रक्रिया देखील कमी दरात होणार असून यामुळे रुग्णाचा फायदा होणार आहे.

आरोग्याच्या दृष्टीने शिरदाळे ग्रामपंचायत कायमच तत्पर राहिली आहे. या शिबिरात देखील ग्रामपंचायतच्या वतीने पुढाकार घेऊन सरपंच सौ.जयश्री संतोष तांबे,उपसरपंच बिपीन चौधरी,मा.सरपंच मनोज तांबे,गणेश तांबे,मा.उपसरपंच मयुर सरडे तसेच गावातील तरुण सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले. या शिबिरात सहभागी झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व सरपंच,उपसरपंच आणि सर्व सदस्यांचे आभार मानले. तसेच अशीच समाजहिताचे उपक्रम गावात राबवत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

या शिबिराचे उदघाटन गावातील शेष्ठ नागरिक किसन तांबे,मा.चेअरमन कांताराम तांबे,बबन हरिभाऊ रणपिसे,तात्याभाऊ चौधरी,विकास रणपिसे ,मचिंद्र चौधरी,यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी नेत्र तपासणी करणारे यामध्ये जनसंपर्क अधिकारी श्री.रवींद्र कानडे,नेत्र चिकिस्थक राणी चाटे,नेत्र सहाय्यक दीप्ती ठोकळ यांच्यासह गावातील भगवंत तांबे,गेनभाऊ रणपिसे,आकाश दौंडकर,रोहन रणपिसे हे देखील उपस्थित होते. मा.चेअरमन कांताराम तांबे यांनी त्या संपूर्ण टीमची व्यवस्था पाहिली.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.