आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आंबेगाव तालुक्यातील लोणीच्या मानकरी वाळूंज मंडळीची पाण्याची अखंड सेवा !!!

आंबेगाव तालुक्यातील लोणीच्या मानकरी वाळूंज मंडळीची पाण्याची अखंड सेवा !!!

धामणी (ता.आंबेगाव) येथील कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबाच्या माही पुनवेच्या यात्रेच्या सोहळ्यात देवाचे दर्शनासाठी भर उन्हात येणार्‍या शेकडो भाविकांना पिण्यासाठी रांजणातील थंडगार पाणी देण्याची अखंड सेवा वाळूंजनगर (लोणी) येथील वाळूंज पाटील वाड्याने जपलेली असल्याचे पहावयास मिळाले.

वाळुंजनगर (लोणी) येथील कै.लक्ष्मण अनाजी वाळूंज,कै.कृष्णाजी उदाजी वाळूंज यांच्या पुढाकाराने भाविकांना पिण्याचे पाणी पाजण्याची सुरुवात शंभर वर्षापूर्वी सुरु केलेली आहे. त्यानंतरच्या पुढच्या पिढीतील बबन लक्ष्मण वाळूंज,प्रभाकर रामभाऊ वाळूंज,शिवराम लक्ष्मण वाळूंज,दत्तोबा गेनू वाळूंज,बाळासाहेब गेनू वाळूंज,महादू गेनू वाळूंज,शिवाजी रघुनाथ वाळुंज,किसन शिवराम वाळूंज,विठ्ठल शिवराम वाळूंज,लक्ष्मण शिवराम वाळूंज,कैलास शिवराम वाळूंज, रघूनाथ शिवराम वाळूंज,देवराम बबन वाळूंज,या जुन्या जाणत्या मंडळीनी परंपरा जतन करुन ठेवली.

यामधील काही मंडळी आज हयात नाहीत.या पूर्वापार सुरु असलेल्या पाण्याची सेवा व परंपरेबद्दल माहीती देताना वाळूंजनगरचे कैलास वाळूंज म्हणाले,माघ शुध्द पौर्णिमेच्या दिवशी पहाटे खंडोबाचा नैवेद्य व पाण्याचा रांजण घेऊन वाळूंज मंडळी लोणीहून खंडोबा मंदिरात येतात.

नवीन रांजणाची खंडोबासमोर पूजा व आरती करुन तो रांजण मंदिराच्या आवारातील उजव्या बाजूच्या ओट्यावर ठेवण्यात येऊन रांजणाला फुलांचा हार घालण्यात येतो.त्यानंतर समस्त वाळूंज मंडळी लहान मुले,महिला,वयोवृध्द मंडळीना घेऊन बैलगाडीने वाजतगाजत मंदिरासमोर आणतात.पाच महिलाच्या डोक्यावर पाच पितळी हांडे व एका महिलेच्या डोक्यावर सहावी घागर देऊन विहीरीवर जाऊन पाणी दोरखंडाने शेंदण्यात येऊन ते या हंड्यात व घागरीत भरुन ते मंदिरातील रांजणात ओतण्यात येऊन दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना पाणी वाटपाची सेवा माही पुनवेच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी सातपर्यत अखंड सुरु असते.

यावेळी रांजणातील पाणी जसजसे संपेल तसतसे विहीवरुन डोक्यावरुन पाणी आणून त्या रांजणात महिला ओतत असतात.यावेळी विहीरीवरुन पाणी दोरखंडाने शेंदण्याचे काम पुरुष मंडळी अखंडपणे करत असतात.प्रत्येक पुरुष व महिला भाविक व तरुण मंडळीचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो.संध्याकाळी सात वाजता समस्त वाळूंज पाटील मंडळी आपल्या प्रत्येक घरातील टाकाचे देव ताम्हणात घालून दिवटी पेटवून रांजणाजवळ वाजत गाजत आणतात.

त्यानंतर सार्वजनिक तळीभंडार करुन सदानंदाचा येळकोट असा जयघोष करण्यात येतो सेवेकरी वाघे व भगत मंडळीकडून आरती करण्यात येते.सुरुवातील सहा घरे असलेल्या वाळूंज मंडळीचे सहा देवाचे टाक होते. आता जवळजवळ अठरा देवाचे टाकाची पूजा करण्यात येऊन दिवटी पाजळवून या पाणी वाटपाच्या सोहळ्याची सांगता होते.

यावेळी वाळूंजनगरचे मानकरी अशोक शिवाजी वाळूंज,चंद्रकांत फकीरा वाळूंज,राजेश वाळूंज,गणेश वाळूंज,विजय वाळूंज,देविदास वाळूंज,विश्वास वाळूंज,संतोष वाळूंज,सुभाष वाळूंज,वसंत वाळूंज,अरुण वाळूंज,महेश वाळूंज,तुकाराम वाळूंज,सखाराम वाळूंज यासह महिला सौ.शांताबाई वाळूंज,सौ.नंदा वाळूंज,सौ.लक्ष्मीबाई वाळूंज,श्वेता वाळुंज,सोनाली वाळुंज,दिव्या वाळुंज,सौ.पुनम वाळूंज यांच्यासह पुण्यामुंबईहून आवर्जून आलेली वाळूंज मंडळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती.

या वाळूंज मंडळीनी रांजणाच्या ओट्यावर मागील वर्षी लोखडी सभामंडप देवस्थानाला अर्पण केलेला आहे.ग्रामस्थ व देवस्थानच्या वतीने मानकरी वाळूंज मंडळीचा देवस्थान जिर्णोध्दार समितीचे प्रकाश पाटील जाधव,सेवेकरी दादाभाऊ भगत,शांताराम भगत,सुभाष तांबे,धोंडीबा भगत,ज्ञानेश्वर जाधव वाघे, सिताराम जाधव वाघे यांनी मानाचे श्रीफळ देऊन सत्कार केला.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.