जुन्नर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत १५२ संघांचा सहभाग !!समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या मुला–मुलींच्या संघाचा प्रथम क्रमांक !!


पंचनामा बेल्हे प्रतिनिधी – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय व क्रीडा परिषद पुणे, जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटना व समर्थ रुरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ज्युनिअर कॉलेज बांगरवाडी बेल्हे आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा दि.९/९/२०२५ ते १०/९/२०२५ या कालावधी मध्ये समर्थ स्पोर्ट अकॅडमी येथे संपन्न झाली.या कबड्डी स्पर्धेत जुन्नर तालुक्यातील विविध विद्यालयातील मुला–मुलींचे १५२ संघ सहभागी झाले होते.
यामध्ये समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या १९ वर्ष वयोगटातील मुला-मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला.
स्पर्धेतील विजयी संघांना संस्थेचे सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके सर,समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर,कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ कुलदीप रामटेके,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.संतोष घुले यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी खेळाडूंचे कौतुक करताना विश्वस्त वल्लभ शेळके सर म्हणाले की समर्थ स्पोर्ट अकॅडमी मध्ये खेळाडूंकडून नियमित खेळाचा सराव करून घेतला जातो. तज्ञ मार्गदर्शकांकडून वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते.

समर्थ जुनियर कॉलेजच्या मुलांच्या व मुलींच्या कबड्डी संघाने आपल्या कर्तृत्वाने आणि जिद्दीने प्रथम क्रमांक पटकावला आहे, ही अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे.कठोर परिश्रम, शिस्त, संघभावना आणि खिलाडूवृत्ती मुळेच हे यश संघाला मिळाले आहे. खेळाडूंच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे समर्थ संकुलाचे नाव उज्ज्वल झाले असून इतर खेळाडूंसाठी हे प्रेरणादायी ठरेल.संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक व संबंधित सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:-
१४ वर्ष मुले :-
प्रथम क्रमांक:- रे बा. बाळाजी देवकर वि. वडगाव आनंद
द्वितीय क्रमांक :- शिवनेर विद्यालय, आर्वी
१४ वर्ष मुली:-
प्रथम क्रमांक:- गुरुवर्य रा.प.सबनिस विद्यालय,नारायणगाव
द्वितीय क्रमांक :- महालक्ष्मी विद्यालय,उंब्रज
१७ वर्ष मुले :-
प्रथम क्रमांक:- गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यालय,नारायणगाव
द्वितीय क्रमांक :- ज्ञानदा माध्यमिक विद्यालय,मंगरूळ
१७ वर्ष मुली :-
प्रथम क्रमांक :- माध्यमिक विद्यालय,गुंजाळवाडी
द्वितीय क्रमांक:- संत गाडगे महाराज,पिंपळगाव जोगा
१९ वर्षे मुले :
प्रथम क्रमांक :- समर्थ जुनियर कॉलेज,बेल्हे
द्वितीय क्रमांक :- छत्रपती जुनियर कॉलेज,जुन्नर
१९. वर्ष मुली:-
प्रथम क्रमांक :- समर्थ जुनियर कॉलेज,बेल्हे
द्वितीय क्रमांक :- कुकडी व्हॅली जुनियर कॉलेज,येडगाव
संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य वैशाली आहेर, समर्थ गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे, प्रशासकीयअधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.

स्पर्धेमध्ये पंच म्हणून पुणे जिल्हा कबड्डी असो.संघ राजन वाबळे व इतर,क्रीडा संचालक एच.पी. नरसुडे, सुरेश काकडे, गणेश राऊत, संजय खराडे सचिव जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटना, विनायक वऱ्हाडी, राहुल अहिरे, यांनी काम पाहिले.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी डॉ.नंदकुमार मुऱ्हेकर,प्रा.संतोष पोटे,प्रा.राजेंद्र नवले यांनी स्पर्धेचे उत्तम नियोजन केले.