जवळे (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चित्रकला स्पर्धा संपन्न!!


पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत जवळे यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळे येथे गणेशोत्सवामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
यामध्ये इयत्ता १ली प्रथम क्रमांक:- शिवांश लायगुडे, इ २री मध्ये आरोही शिंदे,३री मध्ये शिवराज गायकवाड ४थी मध्ये साहिल पिंपळे,
दुसरा क्रमांक:-१ली,अथर्व गावडे,२री शुभम शहादेव, ३री स्नेहा गावडे,४थी स्वप्नाली खिलारी
तिसरा क्रमांक:- १ली, सक्षम शिंदे,२री विराज शिंदे, ३री कार्तिकी वाळुंज ४थी स्नेहा पवार याप्रमाणे विद्यार्थ्यांचे नंबर आलेले असून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.सहभागी सर्व विद्यार्थ्यांसाठी उत्तेजनार्थ म्हणून प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

यावेळी जवळे गावच्या आदर्श सरपंच सौ.वृषाली उत्तम शिंदे पाटील, उपसरपंच सौ.मनीषा टाव्हरे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिता वाळुंज, मुख्याध्यापिका सविता गांजाळे,सहशिक्षक संतोष आचार्य सर, ग्रामपंचायत अधिकारी शिला साबळे, नयन खालकर, महादेव शिंदे यांच्या सह माता-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होतेअशी माहिती शाळा व्यवस्थापनचे मा.अध्यक्ष उत्तम शिंदे पाटील यांनी पंचनामाशी बोलताना दिली.
