आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

संततधार पावसामुळे भराव खचला, आणि थेट घरच कोसळले!!

पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यात गेली चार पाच दिवसापासुन सुरु असलेल्या संततधार पाऊसामुळे पहाडदरा-ठाकरवाडी (ता.आंबेगाव) येथील बबन सखाराम कडाळे यांचे राहते घर सोमवारी राहत्या घराच्या मागील बाजूस उंचावर असणाऱ्या घराचा पुढील ओटा पुर्णपणे खचल्याने तो संपुर्ण भरावा सकाळी ठिक नऊ वाजता बबन कडाळे राहते घरावर कोसळला.यात गृहउपयोगी वस्तुचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.त्यांचं अन्न धान्य पुर्णपणे भिजून खराब झाले आहे.

याची माहिती मिळताच मा.गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्याक्ष ॲड. प्रदिप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तातडीने मदत करून त्यांना सध्या राहण्याची सोय म्हणून २टेंट आणी ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून जखमीना ग्रामीण रुग्णालयात मंचर येथे दाखल करण्यात आले.

वेळेत उपचार मिळाल्यमुळे रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे.त्यावेळी पारगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे व भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे तसेच सुरक्षा अधिकारी गाढवे , गावचे सरपंच मच्छिंद्र वाघ, उपसरपंच कैलास वाघ, ग्रामविकास अधिकारी सोनाली भालेराव,पोलीस पाटील निलेश भालेराव,कल्पेश वाघ,संकेत वाघ यांनी सदर जागेची पाहणी केली असता खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आढळून आले असुन प्रशासनाच्या वतीने मदत देण्याचे कबूल केले आहे.तसेच तलाठी ऋारराज ढवळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

पहाडदरा (ता.आंबेगाव ) येथील ठाकरवाडी येथे नुकसानग्रस्त जागेची पहाणी करताना.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.