गुजरात येथील गव्हर्नमेंट आर्ट्स कॉलेज, वाव बनासकांथा या महाविद्यालयाची आवटे महाविद्यालयास भेट !!


पंचनामा मंचर प्रतिनिधी – रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयास गव्हर्नमेंट आर्ट्स कॉलेज, वाव बनासकांथा गुजरात या महाविद्यालयाच्या टीमने भेट दिली.
आवटे महाविद्यालयाला NAAC द्वारे” A” ग्रेड आणि CGPA 3.06 सह मान्यता मिळालेली आहे. महाविद्यालयाचे शैक्षणिक कार्य अतिशय उत्कृष असून राष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांचे महत्त्वपूर्ण असे योगदान आहे. NAAC मध्ये चांगली ग्रेड मिळवण्यासाठी महाविद्यालयाने कशा पद्धतीने प्रयत्न करावेत याचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी सदर महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.मीना शर्मा, प्रा.चेतन कुमार साधू (IQAC को-ऑर्डिनेटर), प्रा.महेश कुमार परमार, प्रा. शिवा भाई खंबाला यांची टीम महाविद्यालयामधे दाखल झाली.

आवटे महाविद्यालयाच्या IQAC को-ऑर्डिनेटर प्रा. हेमांगी गावित यांनी महाविद्यालयाबद्दल तसेच महाविद्यालयामध्ये राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सर्वच सात क्रायटेरिया प्रमुखांनी NAAC साठी डॉक्युमेंटेशन कसे केले याची माहिती दिली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.एस. गायकवाड यांनी उपस्थित टीमला अनेक सूचना केल्या. उपस्थित टीमने वेगवेगळया विभागांना भेटी देऊन विभागीय कामकाजाचा आढावा घेतला.