आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

पंचनामा विशेष लेखमाला- नाते कलेचे त्या रक्ताशी!!

शाहीर खंदारे साभार लेख - अष्टपैलू कलेने नटलेले, अष्टपैलू कलावंत मा.श्री.महादेव मनवकर ता.क-हाड, जि.सातारा

महाराष्ट्रातील तमाशा कलेवर, प्रेम करणारे रसिकराज,
” नाते कलेचे त्या रक्ताशी ” या लेखमालेचे आजचे आकर्षण, सन २०२३ बेल्हे तमाशा महोत्सवामध्ये,तमाशा रसिकांची मने जिंकणारे व अग्रेसर ठरलेले, सरदार, व्हिलन, हलगी ढोलकी, आणि सोंगाड्या इत्यादी अष्टपैलू कलेने नटलेले, मा.महादेव मनवकर. ता.क-हाड , जि. सातारा हे होय. तमाशाकलेत जीव ओतला की,कला जीवंत होते,जीवंत कला रसिकांना भावते.कलेकडे रसिकमन आतुरतेने ओढते.फडाचे नाव रसिकमनात कोरले जाते,यासाठी कष्ट घ्यावे लागतात, यावर महादेव मनवकर यांचा भरोसा आहे.

मनवकर यांचे आईचे नाव यशोदाबाई असून, त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत.वयाच्या १५ व्या वर्षापासून, महादेव मनवकर यांना तमाशा कलेचा छंद लागलेला होता. आपण मोठे कलावंत आपण का ?होवु नये, हा मनाशी प्रश्न विचारून, तिचं मनातील जिद्द दिवसरात्र कलेचे चिंतन करून पुर्ण केली.एक चांगला तयार कलावंत झाल्यानंतर महादेव मनवकर यांनी, प्रल्हाद मनवकर या तमाशात काम करुन, आपले नाव उंच केले. हा तमाशा त्यांच्या वडिलांच्या नावाने प्रसिद्ध होता. नंतर सध्या महादेव मनवकर तमाशा मंडळ, या नावाने ओपन लोकनाट्य तमाशा मंडळ पार्टी चालू आहे.
महादेव मनवकर यांचे शिक्षण १२ वी पास असुन, त्यांनी पतिव्रतेचा पोलादी किल्ला,सख्खे भाऊ पक्के वैरी, नाती तुटली रक्ताची , सौभाग्य असतं नशिबी , अकालापुरचे माधवराव पाटील, इत्यादी वगनाट्यात एक नंबर च्या भुमिका करुन रसिकांच्या मने जिंकली आहेत. मनवकर यांनी राम भाऊ मनवकर, भिकोबा मनवकर, शंकरराव भुयाचीवाडी, शहाजी मनवकर, शामभाऊ क-हाडकर, धोंडीराम धोंडेवाडीकर, इत्यादी महान कलावंताबरोबर काम करण्याची संधी साधली.

कार्यक्रमात महादेव मनवकर हे आपल्या जिवाचे रान करून, आपली कला रसिकांच्या पदरात पुरेपूर पाडतात. त्यांचे कार्यक्रम कसा चालला आहे यावर लक्ष असते.
मनवकर तमाशा जुन्या पारंपारिक पद्धतीचा असुन, गणगवळण, रंगबाजी, सवाल जवाब, फारसा, कलगीतुरा,छक्कड, आणि वगनाट्य हा तमाशाचा बाज पुरेपूर दाखवतात. मनवकर कला सादर करताना शब्दफेक, वाक्यरचना, बोलण्याचा चढ उतार, आणि शब्दांचा मारा हा काही वेगळाच आहे.मनवकर म्हणतात की, फड मालकांनी आपल्या नावाला साजेसा असा तमाशाचा कार्यक्रम सादर केला पाहिजे.

आज कार्यक्रम करताना परिस्थिती बदलली आहे,कारण तमाशाचा कार्यक्रम रसिकांच्या हाती गेलेला आहे. म्हणुनच रसिकांच्या म्हणण्याप्रमाणे कला सादरीकरण करावी लागते.
कलावंतांनी आणि फड मालकांनी, जुन्या पद्धतीचा तमाशाचा बाज व वगनाट्य दाखविली पाहिजे.मनवकर हे कलेद्वारे समाजप्रबोधन आणि १९९९ पासून, भारत सरकार सुचना व प्रकाशन मंत्रालय स्वान्ग ड्रामा यांच्या मार्फत काम करत आहे.

मनवकर यांचे आज वय , ५० वर्षाचे असून, ३५ वर्ष रसिकांची सेवा करण्यात मोठे योगदान आहे. साक्षरता अभियान हि पण कामे करीत आहेत.
मनवकर या तमाशाला गायिका, नृत्यांगना, आणि अभिनयाची राणी शकुंतला जावळे क-हाडकर आणि, अभिनय सम्राज्ञी, गायिका आरती जाधव क-हाडकर, या दोघींचे गणगवळण, लावणी आणि वगनाट्यात काम करण्याचे लाख मोलाचे सहकार्य आहे .

मनवकर म्हणतात की, कलावंतांनी तन ,मन, धन, एक कला सादर केली तर, पोट भरल्याशिवाय व तमाशा फडाचे नाव गाजल्या शिवाय राहत नाही हे नक्की…………
मनवकर तमाशाने कोल्हापूर,मिरज, सांगली, तासगाव, विटा, चिपळूण, खेड,आणि भोर या पश्चिम महाराष्ट्रात आपल्या नावाचा, झेंडा उभारला आहे.अशा या कलारत्न महादेव मनवकर तमाशा मंडळांच्या हातुन रसिकांची, रंगदेवतेची सेवा घडो, त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.🙏🏻😊
लेखक ✍🏻
शाहीर खंदारे
ता. नेवासा
मो. ८६०५५५८४३२

 

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.