आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आंबेगाव तालुक्याच्या घोडेगाव पंचायत समिती गणातील शिवसैनिकांची बैठक उत्साहात संपन्न!!

शिवसेना आंबेगाव तालुका संवाद दौरा !!

शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवानेते मा.अक्षयदादा शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आंबेगाव तालुक्याच्या घोडेगाव पंचायत समिती गणातील शिवसैनिकांची बैठक दत्तमंदिर परिसर, घोडेगाव येथे उत्साहात संपन्न झाली.

बैठक प्रसंगी अक्षयदादा आढळराव पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करुन आदिवासी भागातील विविध गावचे लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांच्या सूचनांची नोंद घेऊन संघटना वाढविण्यासाठी लक्ष देणार असल्याचे सांगितले.

यावेळी युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनिल बाणखेले, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष डोके, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, शिवसेना घोडेगाव शहरप्रमुख तुकाराम काळे, शिवसेना आंबेगाव तालुका समन्व्ययक राजाभाऊ काळे, शिवसेना उपतालुकाप्रमुख मिलिंद काळे, प्रशांत काळे, शिवाजीराव घोडेकर, शिवसेना विभागप्रमुख अंकुश शेवाळे, घोडेगाव ग्रामपंचायत सदस्य मनोज काळे, संतोष भास्कर, कांचन गायकवाड, ज्योतीताई गाडे, जेष्ठ नेते बबनराव कोकणे, शांताराम काळे, खंडु काळे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

 

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.