आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शिवसैनिकांची बैठक उत्साहात संपन्न!!

शिवसेना आंबेगाव तालुका संवाद दौरा !!

शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवानेते मा.अक्षयदादा शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शिवसैनिकांची बैठक स्क्विरल रिसॉर्ट, डिंभे येथे उत्साहात संपन्न झाली.

बैठक प्रसंगी अक्षयदादा आढळराव पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करुन आदिवासी भागातील विविध गावचे लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांच्या सूचनांची नोंद घेऊन संघटना वाढविण्यासाठी लक्ष देणार असल्याचे सांगितले.

यावेळी युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनिल बाणखेले, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष डोके, मा.जिल्हा परिषद सदस्य विजयराव आढारी, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, शिवसेना उपतालुकाप्रमुख अमोल अंकुश, विश्वास लोहोट, अंकुश शेवाळे, प्रविण कोकणे, शिवसेना विभागप्रमुख संदीप ढेरंगे, आदिवासी सेना तालुकाप्रमुख रामदास भोकटे, शिवसेना विभागप्रमुख सुरेश किर्वे, उपविभागप्रमुख प्रकाश लोहोकरे, जिजाराम दाते, खंडू कोकणे, हरिभाऊ आवटे, दिलीप काळे, संतोष तिटकारे, यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.