आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

धामणी (ता.आंबेगाव) गावचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व श्री.अंकुश भूमकर यांना मा.पंचायत समिती सदस्य श्री.रविंद्र करंजखेले यांनी अनोख्या पद्धतीने दिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

अंकुशराव..
धामणी गावचे माजी सरपंच, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, पाणलोट समितीचे सचिव तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण व आरोग्य संस्थेचे सचिव, दैनिक प्रभात, पुण्यनगरी चे निर्भीड पत्रकार अंकुशराव भुमकर आपणास जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा.. तुमचं आयुष्य सुखाचे समाधानाचे व भरभराटीचे जावो अशी कुलस्वामी खंडेराया चरणी प्रार्थना…

आमचे पत्रकार विठ्ठलराव अंकुशरावला म्हणतात लोकसेवक,फार्मासिस्ट, धडपडीतून घडलेला पत्रकार, निवेदक, विद्यार्थीदूत, निसर्गप्रेमी, शेतकरी, फिरस्ता, खवय्या, म्हटलं तर उद्योजक, सॅटर्डे क्लब मधील मंडळींचा जीवाचा मैतर, गाव कारभारी, धामणी गावचा अभिमानी, पत्रकारांनी ज्या उपाध्या अंकुशला दिल्या त्या योग्यच आहेत कारण प्रत्येक उपाधीमध्ये एक वेगळाच अंकुशराव लपलेला आहे.

मला आठवते अंकुशरावची राजकारणातील पहिली सुरुवात नवरात्राचे दिवस होते. रात्री साडेबारा एक वाजता स्व. रामदास साऊंड यांचा मला कॉल आला माळी मळ्यामध्ये या. निवडणुकीचं वारं वाहत होतं मी माळी मळ्यामध्ये गेलो स्व. शिवाजीराजे, स्व. रामदास साऊंड, सुनील दादा,सुभाष नेते आम्ही लोक अंकुशराव जवळ बसलो. या निवडणुकीमध्ये अंकुशराव तुम्हाला उभं राहावं लागेल असं सांगत होतो. अंकुशराव होय नाही बोलत होते हो नाही करत होते स्व. रामदास शेठ त्यांच्या भाषेमध्ये आणि स्व. राजे त्यांच्या छबी मध्ये अंकुशराव ला तयार करत होते. बघता बघता अंकुशराव तयार झाले. निवडणुकीचा बिगुल वाजला अंकुशराव ग्रामपंचायत सदस्य झाले.

पुढे जाऊन उपसरपंच, सरपंच नंतर पुढच्या निवडणुकीत गावठाणा मधुन मोठ्या बहुमताने ग्रामपंचायत सदस्य अशी अनेक पदअंकुश ला मिळाली. मी नेहमी म्हणतो पदे येतात जातात परंतु एकदा पदावर बसलेला माणूस त्याच्या कार्यकर्तृत्वामुळे जनतेमध्ये आपले स्वतःचे स्थान निर्माण करतो. अंकुश रावांचे सुद्धा असेच झाले जवळच्या हितचिंतकांनी अंकुश रावांना उभे राहण्यासाठी प्रेमाची सक्ती केली. अंकुशराव निवडणुकीला उभे राहिले ज्या दिवशी परमेश्वराच्या आणि लोकांच्या आशीर्वादाने पद मिळाले. त्या दिवसापासून आजतागायत अंकुशराव फक्त लोकांसाठी काम करतात सुरुवातीच्या काळामध्ये अंकुशराव आर्थिक अडचणीतून जात होते. परंतु याच पुण्याईच्या जीवावर आज अंकुशराव अत्यंत चांगल्या स्थितीमध्ये प्रपंच करत आहेत.पारगाव येथे स्वतःचे मेडिकल व पत्नी भूमकर ताई शिक्षिका म्हणून शिंगवे मध्ये चांगले काम करतात. एकंदर जो माणूस चांगलं काम करतो त्याला परमेश्वर फळ चांगलेच देतो.

अंकुश रावांना गावाने सगळी पद दिली. ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच सरपंच शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष पाणलोट चे अध्यक्ष, गावातील अस एकही पद नाही का ते अंकुशरावांना मिळाले नाही.परंतु कोणत्याही पदावर अंकुशराव गेले तर कधी त्या पदाचा गौरव केला नाही. आजही कोणाला काही अडचण आली तरी पहिली आठवण जर कोणाची येत असेल तर अंकुश नावाची. आरोग्याची समस्या असेल मेडिकल मधून काही गोळ्या आणायचे असतील तर पहिला फोन अंकुशरावला जातो. एखादा कार्यक्रम असेल सुखाचा दुःखाचा तरी गावातील ग्रामस्थांना पहिले आठवण अंकुश रावांची. जिथे आज गावातच नाही तर तालुक्यामध्ये सुद्धा अंकुश रावांची एक वेगळी ओळख आहे. जॅक मेडिकल असोसिएशनचे तालुका पदाधिकारी म्हणून ते अत्यंत सुंदर प्रकारे काम पाहत आहेत व पत्रकार म्हणून सुद्धा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून अंकुशराव काम करत आहेत. एखाद्याने चांगलं काम केलं तर त्याची स्तुती आणि एखाद्यानं समाजविरोधी काम केले तर त्याची वाभाडे काढण्याचे काम पत्रकारिताच्या माध्यमातून अंकुशराव आज अत्यंत प्रामाणिकपणे करत आहेत.

अशा एका निर्भीड पत्रकाराला गावातील गरिबांच्या मसीह्याला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.

शुभेच्छुक – रविंद्र करंजखेले (पंचायत समिती सदस्य)

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.