आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

वाढदिवस…. एका निस्पृह सरपंचाचा! म्हणजे जनतेच्या मनातील सागरचा!!

वाढदिवस…. एका निस्पृह सरपंचाचा! म्हणजे जनतेच्या मनातील सागरचा!!

लोकशाहीमध्ये गाव पातळीपासून तर दिल्लीपर्यंत अनेक लोकांना पदाधिकारी होण्याचा योग येत असतो. कधी कधी माणूस अनावधानाने चुकून एखाद्या पदावर येतो .आणि स्वतःमध्ये कर्तुत्व नसलं की पदाचा कालावधी संपल्यानंतर लुप्त होतो. हे सगळं सरपंच पदापासून तर ते खासदार पदापर्यंत होतच असतं…

सहा वर्षांपूर्वी धामणी(ता.आंबेगाव) गावातही असंच घडलं! शासनाने जनतेतून सरपंच निवडायचं ठरवलं. किती जरी म्हटलं तरी गाव पातळीपासून पक्षीय राजकारण सुरू होतं.आम्ही सगळे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते.. पहिल्यांदाच निवडणूक जनतेतून होणार!!
संपूर्ण गाव मतदान करणार!!उभं कोणाला करायचं?हा प्रश्न होताच…अनेक लोक इच्छुक होते…तरुण होते वयस्कर सुद्धा होते!!यातून सगळ्यांच्या तोंडी सागरचं नाव होतं!!!कारण सागरचा मनमिळाऊ स्वभाव कधी कोणाला उद्धटपणे न बोलणं लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत सगळ्यांशी मैत्री करणे या सगळ्या त्याच्या जमेच्या बाजू!!त्यामुळे गावातून सागरच्या नावाचा सूर ऐकू येत होता.

खरं म्हणजे यातूनच सागरला शिवसेना पक्षाची उमेदवारी मिळाली. तसं वातावरण अवघड होतं!!तरीही निवडणुकीमध्ये वरील स्वभावामुळे सागर विजय झाला!!साधा सागर! आम्ही धामणीकर प्रतिष्ठानचा अध्यक्ष!!!मोठ्या धामणी गावचा लोकनियुक्त सरपंच झाला.पण सरपंच होणं तसं सोप परंतु त्या पदाला न्याय देणे अवघड!!!कारण अनेक लोकांच्या डोक्यात पद आलं की हवा जाते..आणि मग मी वर म्हटल्याप्रमाणे ते काळाच्या पडद्याआड लवकरच जातात!!लोक त्यांना विसरतात….

सागर सरपंच झाला. पण पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत सागर सागरच होता! तो कधी सरपंच झालाच नाही!!!त्याचं राहणीमान,त्याचं बोलणं,त्याचं वागणं हे सरपंचासारखं नव्हतच मुळी!!! एकदम साधं सरपंच होण्याआधीच एका बाजूला सागरने गावामध्ये तालुक्यातून जिल्ह्यातून राज्यातून विकास निधी आणण्यासाठी प्रयत्न केला. नव्हे नव्हे तो आणला आहे!!परंतु लोकप्रतिनिधीने कितीही काम केले व वर्तणूक चांगली ठेवली नाही स्वभाव चांगला ठेवला नाही तर त्या कामाचा उपयोग होत नाही. सागरने पाच वर्ष आपल्या स्वभावामधून अनेक लोक जोडली.

अंगणवाडी पासून बारावीपर्यंतच्या कोणत्याही वर्गात गेलं तर प्रत्येक मुलाला सागर नावानिशी आजही ओळखतो !त्यावेळी ओळखत होता आणि मुलं सुद्धा सागर दादा सागर दादा असं त्याही वेळी म्हणत होते आणि आताही म्हणतात !सागर ने कधी कोणाला काम सांगितलेलं मला तरी आठवत नाही. मग विहिरीमध्ये घाण पडलेले असेल, गावामध्ये झाडू मारायचे, देवळामध्ये झाडू मारायचं काम असेल, कोणतेही काम दुसऱ्याला सांगण्यापेक्षा स्वतः करण्यात त्याला आजही आनंद वाटतो…

माणूस पदाधिकारी झाला तर त्याच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये एक वेगळाच दर्प असतो. तो दर्प सागर मध्ये दिसलाच नाही दिसला. तो एक सुस्वाभावी ,एखाद्याच्या दुःखावर ठेवला तरी न सलणारा असा स्वभाव !कोरोनाच्या काळात तर सागरने जिवाची पर्वा केलीच नाही ?कोणालाही कोरोना झाला की सागरने त्याला आपल्या गाडीवर घेऊन दवाखान्यामध्ये ऍडमिट करून यावं .दुसऱ्या दिवशी त्याला पाहायला जावं !त्याचा डबा घेऊन कोरोनाच्या वार्ड मध्ये फिरावं. चुकून एखादी दुर्घटना घडली म्हणजे नातेवाईकांनी आम्ही विधी करणार नाही! शासनाने त्याच्या पद्धतीने करावं असं, म्हटलं की सागरने पुढे यावं, तुम्ही काळजी करू नका गाव तुमच्या बरोबर आहे मी! तुमच्या बरोबर आहे असे आश्वासन द्याव. सगळा विधी स्वतः करावा! असे कमीत कमी वीस-पंचवीस तरी कोरोना चे अंतयविधी सागरने केले असतील.

लोकांच्या सुखात दुःखात सागर! सगळ्यात अग्रभागी. एखाद्याचं लग्न असेल तर आदल्या दिवशी लग्नाचा मांडव तयार करण्यापासून नवरा नवरीला वरातीनंतर घरात आल्यानंतर सागर च कार्य संपलं! मग ते दुःखाचा असो किंवा आनंदाचे असा सागर….

सागरची सरपंच पदाची पाच वर्षे संपली. मी सहज विचार करत होतो या पाच वर्षांमध्ये सागरने काय कमावलं? माझ्या मनामध्ये आलं सागरने माणसं कमवली !सागरने प्रेम कमावलं !सरपंच पदावर माणूस गेल्यानंतर माणूस पैशाचा लोभी होतो असेअनेक अनुभव मला आले .परंतु या पाच वर्षांमध्ये सागरने कधी पैसा कमावला नाही !कधी कोणाकडे एक रुपया सुद्धा कामाचा मागितला नाही! उलट स्वतः काही न कमावता सुद्धा लोकांसाठी प्रचंड वेळ दिला. आणि म्हणून सरपंच नसताना सुद्धा धामणी गावातील माणसांच्या मनावर अधिराज्य तो गाजवतोय …..!गावातील कोणतही काम असो. सांस्कृतिक असो सामाजिक असो या सगळ्या कामांमध्ये आजही त्याची उडी मोठी असते!म्हणुन तर अयोध्येमध्ये राम मंदिर उभे राहत असताना! आयोद्धेत रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. यामध्ये आपण पाठीमागं नको माझं गाव पाठीमागे नको ,म्हणून सागर आणि सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन धामणी गावातील ऐतिहासिक राम मंदिरामध्ये अत्यंत सुंदर असा ह. भ. प. शालिनीताई इंदुरीकर महाराजांचा किर्तनाचा कार्यक्रम ठेवून गावाची संस्कृती परंपरा वाढवली !जिथे अडचण तिथे सागर? असे समीकरण आज सुद्धा गावामध्ये झाले !ज्याचं कोणी नाही त्याचा सागर…

अशा धामणी गावातील लोकांच्या मनावर कायमस्वरूपी अधिराज्य गाजवणाऱ्या अवलियाचा आज वाढदिवस! आपल्या संसाराचा प्रपंचाचा विचार न करता गाव आणि गावातील लोक हाच माझा प्रपंच? हा विचार करणारा सागर सागर तुला वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा….

आपला… रवींद्र करंजखेले(पंचायत समिती सदस्य)

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.