आरोग्य व शिक्षणराजकीय

आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव(खडकी) येथे१४ कोटी ५० लाख रुपयांच्या विकासकामांचा उद्घाटन समारंभ शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव(दादा)आढळराव पाटील व सांगोला विधानसभेचे आमदार ॲड.शहाजी बापू पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न!!

आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव(खडकी) येथे महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन व जिल्हा नियोजन समिती मार्फत जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या सुमारे १४ कोटी ५० लाख रुपयांच्या विकासकामांचा उद्घाटन समारंभ शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील व सांगोला विधानसभेचे आमदार ॲड.शहाजी बापू पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला.

भूमिपूजन समारंभ संपन्न झाल्यानंतर श्रीराम मंदिरासमोरील पटांगणात भव्य जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी बोलताना ॲड.शहाजी बापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील महायुती सरकार सामान्य जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. पिंपळगाव(खडकी) गाव माझ्या पाठीशी सदैव ठाम उभे असून सचिन बांगर यांचा गावासाठी सतत नवनवीन प्रकल्प राबविण्याचा आग्रह असल्याने भविष्यातही चांगल्या स्वरूपाचे काम आणि विकासासाठी जास्तीत जास्त निधी शासन दरबारी पाठपुरावा करून मंजूर करून आणणार असल्याचे प्रतिपादन यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.

कार्यक्रमप्रसंगी युवासेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जलजीवन मिशन योजने अंतर्गत मंजूर झालेली पाणीपुरवठा योजना, गावातील महत्त्वाचे रस्ते, स्मशानभूमी, आरोग्य केंद्र, व्यायामशाळा, प्राथमिक शाळा वर्गखोल्या इत्यादी विकासकामांना १४ कोटी ५० लक्ष रुपये निधी गावच्या इतिहासात पहिल्यांदाच मिळाल्याने गावात आनंदाचे वातावरण असून या सर्व मंजुरी प्रक्रियेसाठी सहकार्य केलेल्या मान्यवरांना धन्यवाद देऊन विकासाच्या पाठीमागे ग्रामस्थांनी उभे रहा असे आवाहन केले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख, मा.आमदार शरददादा सोनवणे, केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे निजी सचिव संदीप पोखरकर, पुणे जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष अरुणराव गिरे, भाजपचे जिल्हा संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनिल बाणखेले, पुणे जिल्हा परिषदेचे मा.शिवसेना गटनेते देविदास दरेकर, युवासेना पुणे जिल्हाप्रमुख प्रविण थोरात पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर, युवासेना तालुकाप्रमुख वैभव पोखरकर, शिवसेना शाखाप्रमुख कैलास पोखरकर, शिवसेना विभागप्रमुख विकास बांगर, युवासेना तालुका सरचिटणीस स्वप्नील बांगर, युवासेना उपतालुकाप्रमुख राहुल पोखरकर पाटील, ग्रामपंचायत सदस्या सौ.सुजाता पोखरकर, सौ.मोहिनी बांगर, सौ.पूजा बांगर, विठ्ठल बांगर, शिवाजी पोखरकर, योगेश बांगर, निखिल पोखरकर यांच्यासह शिवसेना – भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस जाधव यांनी केले उपस्थितांचे आभार श्रीकांत पोखरकर यांनी मानले.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.