आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

पिंपळगाव(ता.आंबेगाव) येथील मुस्लिम बांधव व ग्रामस्थांनी घेतली शिवसेना उपनेते, मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट!!

महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने ग्रामीण क्षेत्र विकास योजनेतून शादीखाना बांधकामासाठी २५ लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देण्याची केली मागणी!!

पिंपळगाव(ता.आंबेगाव) येथील मुस्लिम बांधव व ग्रामस्थांनी घेतली शिवसेना उपनेते, मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट!!

महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने ग्रामीण क्षेत्र विकास योजनेतून शादीखाना बांधकामासाठी २५ लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देण्याची केली मागणी!!

आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव(खडकी) गावातील मुस्लिम बांधव व ग्रामस्थांनी शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांची शिवसंकुल, लांडेवाडी येथे भेट घेऊन महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विभाग यांचे वतीने ग्रामीण क्षेत्र विकास योजनेतून शादीखाना बांधकामासाठी २५ लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

पिंपळगाव(खडकी) येथे मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांची लोकवस्ती आहे. यापूर्वी शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांनी आपल्या खासदार निधीतून कब्रस्तान परिसराच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद केली होती. मुस्लिम बांधवांसाठी धार्मिक कार्य, लग्नसमारंभ व सामाजिक कार्यक्रम घेण्यासाठी वारंवार जागेची उणीव भासत असल्याने महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने ग्रामीण क्षेत्र विकास योजनेतून शादीखाना बांधकामासाठी २५ लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी शिवाजी दादांनी ग्रामस्थांना आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल बांगर, युवानेते श्रीकांत पोखरकर, मुस्लिम समाजाचे नेते इन्नुसभाई इनामदार, प्रा.शफिक जमादार सर, फिरोज इनामदार, इस्माईल इनामदार, साहिल जमादार, सादिक इनामदार यांचेसह मुस्लिम बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.