आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आंबेगाव तालुका एम.एड. उच्चशिक्षित कृती समितीच्या अध्यक्षपदी मच्छिंद्र चासकर तर सरचिटणीस पदी अरविंद मोढवे यांची निवड..

आंबेगाव तालुका एम.एड. उच्चशिक्षित कृती समितीच्या अध्यक्षपदी मच्छिंद्र चासकर तर सरचिटणीस पदी अरविंद मोढवे यांची निवड..

प्रतिनिधी-समीर गोरडे

आज मंचर येथे झालेल्या शिक्षक मेळाव्यात एम. एड. कृती समितीचे राज्य अध्यक्ष राजू जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात ही निवड करण्यात आली. या प्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश मेहेर, निरीक्षक म्हणून उपस्थित होते.


या प्रसंगी मेहेर म्हणाले, ” अनेक शिक्षक उच्च शिक्षित असूनही शिक्षण क्षेत्रात, त्यांना वरिष्ठ पदावर सामावून घेतले जात नाही. अनेक शिक्षकांनी बी.एड, एम.एड, एम. ए. एज्युकेशन, सेट, नेट, पी.एच. डी. धारक अशी उच्च गुणवत्ता धारण केली आहे. यांच्या गुणवत्तेनुसार वरिष्ठ पदावर पदोन्नती दिली जावी.

तसेच अनेक पदवीधर शिक्षकांना उपशिक्षकांपेक्षा कमी वेतन मिळत आहे, या त्रुटी दूर करून त्यांच्या असणाऱ्या विविध समस्या सोडविण्यासाठी ही संघटना सर्वांना बरोबर घेवून काम करील.तसेच राज्य अध्यक्ष राजू जाधव यांनी शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी ही संघटना कटीबद्ध आहे. अशी ग्वाही दिली.

या वेळी निवड झालेल्या कार्यकारिणीचा सत्कार एम. एड.उच्च शिक्षीत शिक्षक कृतीसमिती अध्यक्ष मच्छिंद्र चासकर,सरचिटणीस अरविंद मोढवे, कार्याध्यक्ष भगवंत टाव्हरे, कोषाध्यक्ष किसन शिंगाडे, उपाध्यक्ष संजय केदारी, प्रवक्ता सखाराम मुंजाळ, सह संपर्क प्रमुख सुरेश गाडगे यांचा सत्कार शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन तोडकर,आंबेगाव तालुका शिक्षक पतसंस्थेचे सभापती नारायण गोरे यांचे हस्ते करण्यात आला.या प्रसंगी उपसभापती दत्ता मेचकर,सचिव बाळासाहेब सैद, संचालक कान्होबा डोंगरे, मीनाक्षी वळसे,विकास बाणखेले, बाळासाहेब साबळे, शंकर गवारी, भास्कर चासकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.