आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम स्कूल शाखा शहापूर येथे पालक सभा उत्साहात संपन्न!!
आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम स्कूल शाखा शहापूर येथे पालक सभा उत्साहात संपन्न!!
शहापुर तालुक्यांतील मोहिली – अघई येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट (कोकामठाण)संचलित, आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलतील आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम स्कूल येथे परमपूज्य सद्गुरु आत्मा मालिक माऊलीच्या आशीर्वादाने, संत परिवारच्या प्रेरणेतून, संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी साहेब ,समस्त विश्वस्त मंडळ व स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष तथा विश्वस्त उमेश जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाने संकुलात पालक सभा उत्साहात संपन्न झाली.
यात दि २ व ३ ऑगस्ट २०२४ रोजी जव्हार, शहापूर, नाशिक, डहाणू प्रकल्प व प्रायव्हेट विद्यार्थ्यांच्या पालकांची पालक भेट व सभा आयोजित करण्यात आली. यावेळी प्राचार्य कैलास थोरात यांनी पालकांना वार्षिक शैक्षणिक नियोजन ,शालेय कामकाज व विद्यार्थ्यांची गुणवत्तावाढ या बाबत तसेच शैक्षणिक उपक्रमबाबत माहिती दिली. पालकांनी उत्साहाने सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या शिक्षकांकडून शैक्षणिक प्रगतीबाबतची माहिती जाणून घेतली.तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष संपत पवार.श्री पाटील यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले.
संस्था, शालेय व्यवस्थापन ,प्राचार्य व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल कौतुक त्यांनी केले. तसेच ठाणे, पालघर जिल्ह्यामध्ये एकमेव उत्कृष्ट नामांकित शाळा असल्याबद्दल पालकांना शाळेत प्रवेश घेण्याचा आग्रह करत असतात .यात विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडवून सुज्जन नागरीक घडावे व उच्च पदस्थ अधिकारी घडतील अशी भावना पालकांनी व्यक्त केली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन साबळे यांनी केले व आभार प्रदर्शन सोमनाथ कांबळे यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
याबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी साहेब व संकुलाचे कार्याध्यक्ष तथा विश्वस्त उमेश जाधव साहेब, स्थानिक सदस्य अनंत गायकवाड, प्रवीण मोरे, शैक्षणिक संचालक डॉ.डी.डी शिंदे, जनरल व्यवस्थापक गुलाब हिरे, प्रकल्प समन्वयक राहुल जाधव यांनी विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यसाठी शुभेच्छा दिल्या.