हिरकणी विद्यालय गावडेवाडी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मनोज तळेकर यांची निवड!!
हिरकणी विद्यालय गावडेवाडी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मनोज तळेकर यांची निवड!!
प्रतिनिधी-समीर गोरडे
श्री दत्तगुरु शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हिरकणी विद्यालय गावडेवाडी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा मनोज तळेकर यांची
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली.संस्थेचे सचिव प्रवीण गावडे आणि सह सचिव लक्ष्मण पिंपळे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अध्यक्ष मनोज तळेकर,उपाध्यक्षा सिमा योगेश शिंदे यांची निवड तर सचिवपदी ज्योती दहितुले,सदस्यपदी पिंकाजी लक्ष्मण पवार,सागर दत्ताञय गावडे,संदिप नानाभाऊ मुळे,प्रतिमा संदिप भोर ,निता प्रविण भोर,सारीका प्रताप मेंगडे , शिक्षक सदस्य म्हणुन मुख्याध्यापक विनोद बोंबले यांची निवड करण्यात आली तर विध्यार्थी प्रतिनिधी म्हणून चैताली मेंगडे , कुणाल गावडे यांची निवड करण्यात आली यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुनिल गावडे यांनी सर्वांचे अभिनंदन केले प्रास्ताविक मुख्याध्यापक विनोद बोंबले सर यांनी केले तर आभार ज्योती दहितुले यांनी मानले.