आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आत्मा मालिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांची ब्ल्यू स्टार इंडिया लिमिटेड कंपनीत निवड!!

आत्मा मालिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांची ब्ल्यू स्टार इंडिया लिमिटेड कंपनीत निवड!!

शहापूर तालुक्यातील मोहिली-अघई येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट(कोकमठाण), संचलित अम्रित अभियांत्रिकी महाविद्यालय येथे परमपूज्य आत्मा मालिक माऊलींच्या कृपाशीर्वादाने , समस्त संत परिवाराच्या प्रेरणेतून, संस्थेचे अध्यक्ष श्री नंदकुमारजी सुर्यवंशी साहेब ,समस्त विश्वस्त मंडळ व स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष माननीय श्री उमेशजी जाधव साहेब यांच्या कुशल मार्गदर्शनाने कार्यरत असणाऱ्या आत्मा मालीक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च येथे दि११जुलै रोजी “ब्ल्यू स्टार इंडिया लिमिटेड याकंपनीत, मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते.


सदर कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह करीता अम्रित महाविद्यालयातील, मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या अंतिम वर्ष डिग्रीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
या ड्राईव्ह करीता कंपनीचे पदाधिकारी श्री. रंजीत पाटील यांनी प्री प्लेसमेंट टॉक व टेक्निकल इंटरव्ह्यू अशा टप्प्यातून अंतिम विद्यार्थ्यांची निवड केली.


या सर्व निवड प्रक्रिया यशस्वीरीत्या पार करत, आत्मा मालिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च महाविद्यालयाच्या एकूण सहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.यात प्रशांत पाचघरे, जगदीश पटेल, यदनेश अधिकारी, प्रसाद पाटील, मयुरेश रायत, आणि विरेश भोईर या विद्यार्थ्यांची निवड झाली. सदर विद्यार्थ्यांनी निवडीने संस्थेच्या शिरपेचात मानेचा तुरा खोवला.


स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष माननीय श्री उमेशजी जाधव साहेब यांच्या प्रयत्न, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन याद्वारे दरवर्षी बहुराष्ट्रीय कंपनीचे प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित केले जातात व याद्वारे ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते.


प्लेसमेंट ड्राईव्ह च्या सुरुवातीला आत्मा मालिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च चे प्राचार्य डॉ डी डी शिंदे सर यांनी सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत कौशल्य वाढीवर भर देण्यास सांगितले व त्यांचे मनोबल वाढविले व समारोपावेळी ब्ल्यू स्टार इंडिया लिमिटेड पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.सदर प्लेसमेंट ड्राईव्ह चे यशस्वी आयोजन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक श्री दिपक बाविस्कर यांनी केले. या प्लेसमेंट ड्राईव्ह साठी प्राध्यापक संतोष घुले, प्राध्यापक श्याम कुमार चौधरी, प्राध्यापक विशाखा घायवत व इतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.