आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आंबेगाव तालुक्यातील कोतवालांनी विविध मागण्यांकरिता आंबेगाव तहसीलदार संजय नागटिळक यांना दिले निवेदन..

काय आहेत मागण्या??

आंबेगाव तालुक्यातील कोतवालांनी विविध मागण्यांकरिता आंबेगाव तहसीलदार संजय नागटिळक यांना दिले निवेदन..

प्रतिनिधी-समीर गोरडे

काय आहेत मागण्या??

राज्यातील सर्व कोतवालांना चतुर्थ श्रेणी लागू करावी.तलाठी व लिपीक पदामध्ये २५ टक्के कोटा राखीव ठेवावा,सेवानिवृत्त कोतवाल यांना पेन्शन व अनुकंप लागू करावा,कोतवाल पदाचे नाव बदलवून तलाठी सहाय्यक किंवा महसूल सेवक करणे,सेवानिवृत्त कोतवाल यांना ३०० दिवसांचे रजा रोखीकरण मिळणे,कोतवालमधून शिपाई पदावर देण्यात येणारा ४० टक्के कोटा वाढवून ८० टक्के करावा, ८ फेब्रुवारी २०१९ शासन निर्णयानुसार अटल पेन्शन बाबत सुधारीत जीआर काढावा.

कोतवालांच्या विविध मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने दि. २७ जून रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री यांना दिलेल्या निवेदनास तालुका कोतवाल संघटनेचा पूर्ण पाठिंबा व सहभाग आंबेगाव तालुक्यातील कोतवाल असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी अध्यक्ष भाऊसाहेब जुंद्रेआंबेगाव तालुका कोतवाल संघटना,उपाध्यक्ष संतोष शिंगाडे, सिताराम लांडे,हिरामण पंडीत,अनिकेत पंचरास,विकास दाभाडे,अंकुश राक्षे,संदिप पडवळ,दिपक साळवे,सागर मकर आदी कोतवाल उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.