डॉ.आंबेडकर ग्रंथपाल संघटनेच्या राज्यसचिवपदी शामराव गायधनी
डॉ.आंबेडकर ग्रंथपाल संघटनेच्या राज्यसचिवपदी शामराव गायधनी
नाशिक :- पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखाना माध्यमिक विद्यालयातील ग्रंथपाल शामराव गायधनी यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर शालेय ग्रंथपाल संघटनेच्या राज्यसचिवपदी ग्रंथपाल बांधवांच्या आग्रहामुळे निवड करण्यात आल्याची माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष प्रवीण धुमाळ यांनी दिली.
शामराव गायधनी यांनी नि:स्वार्थपणे काम करत कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा न ठेवता विविध जिल्ह्यांतील ग्रंथपालांचे फिक्सेशनचे प्रश्न सोडवले.
राज्यभरातील शाळांमधील अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ नियुक्ती मिळावी, यासाठी आपल्या सहकाऱ्यांसह शामराव गायधनी यांनी शासनदरबारी अथक परिश्रम घेतले. तसेच ग्रंथपालांचे विविध प्रश्न सोडवत त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.