आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

राज्यस्तरीय अथलेटिक्स स्पर्धेत १५०० मीटर धावणे प्रकारात आत्मा मालिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च(अभियांत्रिकी)चा महेंद्र दळवी प्रथम!!

राज्यस्तरीय अथलेटिक्स स्पर्धेत १५०० मीटर धावणे प्रकारात आत्मा मालिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च(अभियांत्रिकी)चा महेंद्र दळवी प्रथम

पुणे – श्री रामचंद्रा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड पॉलीटेक्निक लोणीकंद,पुणे व इंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडन्ट स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य द्वारा (MSBTE , IEDSSA) राज्यस्तरीय अथलेटिक्स स्पर्धा डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी सणस क्रीडांगण सारसबाग पुणे येथे दिनांक १७ मार्च रोजी संपन्न झाल्या यात अभियांत्रिकी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट, (कोकमठाण) संचलित, आत्मा मालिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च(अभियांत्रिकी)चा राज्यस्तरीय अथलेटिक्स स्पर्धेत १५०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात मेकॅनिकल डिप्लोमा द्वितीय वर्षात शिकणारा महेंद्र दळवी प्रथम क्रमांक पटकावला. क्रीडा शिक्षक शशिकला खडताळे यांनी अथक परिश्रम घेतले. संकुलाचे कार्याध्यक्ष उमेशजी जाधव साहेब,विश्वस्त अनंत गायकवाड,प्रवीण मोरे,संकुलाचे सहाय्यक शैक्षणिक संचालक, प्राचार्य डॉ. डी.डी. शिंदे, उपप्राचार्य डॉ.गोविंद चव्हाण सहाय्यक व्यवस्थापक गुलाब हिरे , प्रा.उल्हास पाटील, एच आर प्रशांत गाडे आदीनी कुमार महेंद्र दळवी यांचे मिळवलेल्या यशाबद्दल कौतुक केले.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.